नांदेड – शहरातील सप्तगिरी काॅलनीत वास्तव्यास असलेले गटशिक्षणाधिकारी प्रा. प्रदिप सुकाळे यांना जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पोटा बु. च्या वतीने अत्यंत सन्मानपूर्वक व साश्रू नयनाने निरोप दिला. त्यांनी केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निरोप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा पोटा केंद्राच्या केंद्रीय मुख्याध्यापिका सुनीता संगेवार होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून रमेश संगपवाड माजी गटशिक्षणाधिकारी हिमायतनगर, राजू जाधव सरपंच पारवा, मारोती जाधव, अरुण पाटील ( शि.वि.अ. हिमायतनगर) दिपक कुलकर्णी ( शि.वि.अ. हिमायतनगर ) बालाजी राठोड माझी पंचायत समिती सदस्य, केंद्रप्रमुख एम.डी.शेख, दत्तात्रय धात्रक, गणेश कोकुलवार, संजय जान्ते, केंद्रीय मुख्याध्यापक नामदेव राठोड, पुरुषोत्तम ठाकूर, पत्रकार पांडुरंग मिरासे, आनंदराव जळपते, पत्रकार गऊळकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय जान्ते यांनी केले तर व्यक्तिपरिचय नारायण गायकवाड यांनी दिला. यावेळी बोलताना माजी गटशिक्षणाधिकारी रमेश संगपवाड म्हणाले, आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जगा आणि सुकाळे साहेबांसारखे चिरतरुण राहा. यावेळी बोलताना प्रदीप सुकाळे म्हणाले, एक खंत मनाला राहिली कि मला प्रत्यक्ष काही करता आलं नाही. खुर्चीवर बसलो आणि आवाहन करीत राहिलो शाळा सुरू असत्या तर कदाचित मी कार्यालयात एकही दिवस बसलो नसतो. ऑनलाइन मध्ये फारशी अचिव्हमेंट नाही. माझ्या कार्यकाळात जर कोणाला त्रास झाला असेल तर तो प्रशासनाचा एक भाग म्हणून सोडून द्यावा व आनंदाने जगा अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिला. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शंकर गच्चे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सुधाकर गायकवाड यांनी मानले.