अर्ज एक योजना अनेक mahadbt पोर्टल आता मोबाईलमध्ये ; तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांची माहीती

कंधार ;प्रतिनिधी

कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मागील वर्षांपासून mahadbt पोर्टल वर अर्ज करण्यासाठी आवाहन कंधार तालुका कृषी विभागाच्या वतिने तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी केले आहे.

mahadbt पोर्टल वर यापूर्वी अर्ज करण्यासाठी csc सेंटर/लॅपटॉप/कॉम्प्युटर ची गरज पडत होती.आता यामध्ये सुधारणा करून आपल्या मोबाईल मधील app मधून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी app डाउनलोड करून घ्यावे व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी त्याचा वापर करावा. असे आवाहन कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक चा वापर करावा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.mahadbtagri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *