पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मीती आहे -प्रा. डॉ.परमेश्वर पौळ


मुखेड – आपण नैसर्गिक संसाधनांचा वापर स्वार्थासाठी करत आहोत. अनेक प्रगत राष्ट्र विकासाच्या नावावर पर्यावरणाचा -हास करताना दिसत आहेत. आपण इकॉलॉजी ऐवजी इकाॅनाॅमीला अधिकचे महत्त्व देत आहोत.प्रत्येक जीवासाठी निसर्गाने मुबलक पाणी उपलब्ध केले आहे पण त्याचे व्यवस्थापन आपण व्यवस्थित करत नाहीत.


जलव्यवस्थापनात पाणी सर्व सजीवांना परिपूर्ण , समन्यायी मिळावे व त्याचा वापर कार्यक्षम होण्यासाठी प्रा. पौळ यांनी जलव्यवस्थापन हे तीन टप्प्यांत करण्यांस सांगितले. यात पहिला टप्यात जलसंसाधन विकास व्यवस्थापन, दुसरा टप्यात जल पुरवठा व्यवस्थापन व तिसरा टप्यात जल वापर व्यवस्थापन या तिन्ही टप्या पाणी ताळेबंद व जलसाक्षरतेचा ची भूमिका महत्त्वाची दिले पाहिजे. सध्यस्थितीत केवळ पहिल्या टप्यातच जलव्यवस्थापन काही प्रमाणात होते पण तिन्ही टप्यात शंभर टक्के पाणी व्यवस्थापन झाले तर पाणीटंचाई राहणार नाही शिवाय परिसराचा शाश्वत विकास होईल. जलव्यवस्थापनात करत असतांना पाणी साटा , पाणीपुरवठा व वापर या व्यवस्थेशी निगडित प्रत्येकानी यात सहभाग घ्यावा. प्रामुख्याने प्रशासकीय अधिकारी , लोकप्रतिनिधी, जल अभ्यासक व नागरिक याच्यात समन्वय प्रस्थापि केल्याशिवाय जलव्यवस्थापनात कार्यात अपेक्षित यश येणार नाही. शेतीसाठी पाण्याचा वापर सर्वाधिक होतो. तेथेही सूक्ष्म सिंचन, ठिबक, तुषारचा वापर करून पाणी बचत केली पाहिजे. आपण आपल्या घरीही छोट्या छोट्या कृतीतून पाणी बचतीला महत्त्व दिले पाहिजे. पाणी व्यवस्थापन कार्यात लोकसहभाग वाढवला पाहिजे. केवळ सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही. शेंबोली व सायाळ या गावात जल व्यवस्थापनासाठी केलेल्या कामाची सविस्तर माहिती ही त्यांनी पी.पी.टी.च्या माध्यमातून देऊन अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण दिले. पाण्याची बचत म्हणजेच पाणी निर्मिती होय असे प्रतिपादन शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथील भूगोल विभागात कार्यरत प्रा. डॉ. परमेश्वर पौळ यांनी ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय, वसंतनगर ता. मुखेड जि. नांदेड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘ जल व्यवस्थापन काळाची गरज’ या विषयावर आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय वेबिनार प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.


या वेळी उदघाटकीय मार्गदर्शन करताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. डॉ. शिवराज बोकडे म्हणाले की मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यात पाणी ही ही मुलभूत गरज आहे. सर्व सजीवांसाठी त्यांचे आत्यंतिक महत्त्व असल्यामुळेच आपण त्याला जीवन असे म्हणतो. पाणी कपात करा नाही तर पाणी कपात मिळेल. आपण पावसाचे पाणी अडविले व मुरवले पाहिजे.पूर्वी गावात मातीचे रस्ते होते म्हणून पावसाचे पडलेले पाणी मुरायचे पण आता सिमेंटचे रस्ते आल्यामुळे ते जमिनीत न मुरता वाहून जात आहे. आपण जमिनीच्या पोटातील पाणी बाहेर काढत आहोत. लातूरला दोन वर्षांपूर्वी भीषण पाणीटंचाई झाली होती. त्यामुळे रेल्वेने पाणी आणावे लागले. आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ.उध्दवजी भोसले साहेब हे जलव्यवस्थापनासाठी अत्यंत जागरूक आहेत. त्यांनी विद्यापीठात बारा साठवण तलाव उभारून विद्यापीठाला पाण्याबाबत स्वयंपूर्ण बनवले आहे. जलव्यवस्थापनाला लोकचळवळीचे स्वरूप यावे.


अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड म्हणाले की रा.से.योने चांगला विषय व वक्ते निवडल्या यामुळे मला समाधान वाटले. प्रा. डॉ.परमेश्वर पौळ यांनी प्रात्यक्षिकासह हा विषय मांडला आहे. आधी केले मग सांगितले असे त्यांचे काम आहे.आपण जर वेळीच पाण्याचे नियोजन केले नाही तर आपले भविष्य हे नक्कीच संकटमय बनणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पाणी बचतीचा संकल्प केला पाहिजे.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. एस.बाबाराव यांनी करून कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका विशद केली. पाहुण्यांचा परिचय प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ. रामकृष्ण बदने व आय.क्यू.ए.सी.समन्वयक प्रा.बळीराम राठोड यांनी करून दिला.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘हम होंगे कामयाब’ हे गीत प्रा. डॉ. महेश पेंटेवार यांनी सादर केले. सूत्रसंचलन रा.से.यो. सल्लागार समिती सदस्या प्रा.सौ.अरुणा ईटकापल्ले यांनी केले तर आभार रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.शंकरय्या कळ्ळीमठ यांनी मानले.
कार्यक्रमाची तांत्रिक बाजू रा.से.यो. सल्लागार समिती सदस्य प्रा. डॉ.महेश पेंटेवार यांनी सांभाळली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समिती सदस्य प्रा. देविदास पवार ,दुसरे सल्लागार समिती सदस्य श्री. रमेश गोकुळे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे,माजी प्राचार्य डॉ. देविदास केंद्रे,स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. व्यंकट चव्हाण, सहस्टाफ सेक्रेटरी प्रा.सौ.शिल्‍पा शेंडगे, तसेच महाविद्यालयातील अन्य प्राध्यापक तसेच महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातून प्रा. डॉ.अर्चना देशमुख,प्रा. बालाजी गूरुडे, प्रा. डॉ. बालासाहेब गोडबोले, प्रा.भारत राठोड, प्रा.गाडगीळ,प्रा. डॉ. पांडुरंग आचोले,प्रा. ओमप्रकाश दरक, प्रा. डॉ.अण्णा गरड, डॉ. नितीन पवार,प्रा. डॉ. राजेश कोटलवार,प्रा.सूनिल कदम, प्रा.सुरेश कुलकर्णी, डॉ. नितीन देशमुख व अन्य प्राध्यापक तथा विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *