नांदेड – शहरातील खडकपुरानजीक असलेल्या पंचशील नगरातील महिलांनी पाणी, घरकुल, रोड, नाल्या, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाईन आदी सुविधांसाठी महापालिकेसमोर निदर्शने केली.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात प्रत्येक घरासमोर चा प्रेशर लाईन चा पाइप जोडण्यात यावा. पंचशील नगर येथे २५ टक्के लोकांनाच घरकुल मंजू झालेले असून बाकी लाभार्थ्यांनाही घरकुल मिळणे बाकी आहेत ते मंजूर करण्यात यावे, नगर मधील रोड अत्यंत अडचणीचे आहेत ते चालण्यासारखे नाहीत. रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे, या नगरमध्ये ७५% नाल्यांचे काम करण्यायोग्य आहे. ते करण्यात यावे. ड्रेनेज लाईन लवकरात लवकर चालू करण्यात यावी. वरील मागण्या पूर्ण नाही तीव्र प्रकारचा मोर्चा आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर पंचशील नगर येथील अनिल थोरात, वैशालाबाई धुळे , वंदनाबाई थोरात, कलावतीबाई गोडबोले, उषाबाई जमदाडे, जिजाबाई पारदे हरणाबाई वाघमारे, शिलाबाई सातोरे, बबन हटकर, अंबिकाबाई नवगिरे, मिनाबाई राजभोज, पूजा हिंगोले कल्पनाबाई खाडे, गोडबोले, साळवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.