कोरणा कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या कोरोणा योद्ध्यांचा कंधार शिवसेनेच्या वतिने सत्कार कंधार

कोरणा कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या  कोरोणा योद्ध्यांचा कंधार शिवसेनेच्या वतिने सत्कार
कंधार ;
कंधार तालुका शिवसेनेच्या वतीने दि.२८ जुलै रोजी  ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद फिस्के  यांच्या अध्यक्षतेखाली  शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना कार्यक्षेत्रात कोरोणा विरुद्ध काम करणाऱ्या सर्व कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. निलेंद्र वर्मा, डॉ .शाहीनबेगम ,डॉ. महेश पोकले ,डॉ. शिवराज ,डॉ. भगवान वाघमारे , डॉ. संतोष पदमवार  ,व ग्रामीण रुग्णालयातिल अधिकारी व कर्मचारी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास विधानसभा मतदारसंघ प्रमुख गणेश कुटेंवार , अॅड. मारोती पंढरे ,नगरसेवक अरुण बोधनकर, सचिन श्रीरंगवाड , मोहन जाधव व उपस्थित शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *