सुभाष देशमुख चिकाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सायाळ येथे मास्क, साबण व उद्योग माहिती पुस्तीकेचे वाटप

सुभाष देशमुख चिकाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सायाळ येथे मास्क, साबण व उद्योग माहिती पुस्तीकेचे वाटप

नांदेड,(प्रतिनिधी)- राहुल गांधी विचार मंचचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा महाराष्ट्र एनजीओ संघर्ष समितीचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष देशमुख चिकाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त दि.2 ऑगस्ट 2020 रोजी भोकर तालुक्यातील सायाळ या गावी सकाळी 10 वाजता वयोवृद्ध नागरिक व महिला व गावातील सर्व गावकर्‍यांना मास्क, साबुन व उद्योगांची मातिी पुस्तीका भेट स्वरूपात देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सामाजीक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सुभाष देशमुख चिकाळेकर हे आपला यावर्षीचा वाढदिवस थाटामाटात साजरा न करता सामाजीक उपक्रमाने साजरा करणार आहेत. सध्या जगावर कोरोना महामारीचे संकट वाढत असताना नांदेड जिल्ह्यातही कोरोनाने थैमान घातले आहे. या संकट काळात वाढदिवसावर वारेमाप खर्च न करता सायाळ या गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला व गावातील सर्व गावकर्‍यांना कोरोना काळात उपयोगात येणारे मास्क, हात स्वच्छ करण्यासाठी साबण व उद्योग धंद्यासाठी उपयोग येणारी माहिती पुस्तीका भेट देवून आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. देशमुख हे दरवर्षी विविध उपक्रम राबवित असतात. त्यात महानुभाव पंथाच्या साधुसंतांचा सेवा गौरव करणे, डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबवणे, वेगवेगळ्या घटनेत अपघाती निधन झालेल्या कुटूंबियांना आर्थिक मदत करणे या प्रकारचे अनेक आंदोलन राबवित आहे व यापुढेही सदरील उपक्रम चालूच ठेवणार असल्याची माहिती कै.पद्मीनबाई देशमुख सेवाभावी संस्था चिकाळा ता.मुदखेड, जि.नांदेड. अध्यक्ष सुभाष देशमुख चिकाळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेकांना प्रेरणा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *