लांडगेवाडी येथे,सेतू अभ्यास शिक्षक मित्र निवड

लोहा/(ता.प्रतिनिधी)
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांडगेवाडी ता.लोहा येथे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना सेतू अभ्यास संदर्भात माहिती देऊन, गतवर्षी प्रमाणे घराजवळच्या, वार्डातील विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासासह अन्य बाबीसाठी पूरक मार्गदर्शन करीत शिक्षकांची भूमिका पार पाडण्यासाठी शिक्षक मित्रांची नेमणूक करण्यात येत आहे, यासंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली तसेच शा.व्य.समिती उपाध्यक्ष प्रतिनिधी श्री. शिवहार टोपारे (पालक)यांनीही शिक्षक मित्र होणेसाठी सकारात्मक प्रतिसाद देत लगेचच होकार दिला.. त्याबद्दल त्या सर्वांना लेखी सूचना देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


यावेळी शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री. मंगल सोनकांबळे शा.व्य.समिती उपाध्यक्ष प्रतिनिधी श्री.शिवहार टोपारे,सहशिक्षक श्री.केरबा मद्देवाड, शिक्षक मित्र म्हणून निवड झालेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी कु.शिवाणी लांडगे, कु.गायत्री लांडगे, कु.वंदना वाडकर, कु.वर्षा सोलापुरे आदी उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *