लोहा/प्रतिनिधी.शिवराज दाढेल लोहेकर.
संबंध नांदेड जिल्ह्यायात डॉ, अण्णाभाऊ साठे यांची लोहा येथील जयंती लक्षवेधी असते आणि या जयंती उत्साहात व उत्सव साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील समाज बांधव उत्साहाने मोठ्या संख्येने उपस्थित राहतो मात्र येथे अंदाजे दहा वर्षापासून पाठपुरावा करून सुद्धा नियोजित जागेवर अण्णाभाऊ साठे स्मारक उभे झाले नाही उलट या स्मारक परिसरात अनेकांनी अतिक्रमणं केले असून जवळच मोठा नाला असल्याने दुर्गांधी पसरलेली आहे या प्रकरणी नगर परिषद लोहा यांनी केलेले अतिक्रमण हटवावे दुर्गंधी दूर करीत जागेचे सुशोभीकरण करावे आणि 01 ऑगस्ट 2021 रोजी जयंती दिनाच्या अगोदर जगविख्यात अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभे करावे अशी मागणी मातंग समाजातील युवकांनी न पा चे मुख्याधिकारी तथा लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असून निवेदनावर समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणात सहया केल्या आहेत
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि आपल्या देशात तसेच सर्व विश्वात साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती श्रमिक, कष्टकरी, कामगार, दलित, पददलित मोठ्या उत्साहाने साजरी करतात आणि यंदाचे हे अण्णाभाऊ साठे जयंतीचे जन्मशताब्दीचे विशेष वर्ष आहे म्हणून लोहा शहरात अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभे होणे अत्यंत गरजेचे आहे लोहा शहरातील नांदेड लातूर हायवे रस्त्यालगत अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी ची नियोजित जागा असून ती एका मोठ्या नाल्याजवळ आहे त्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे म्हणून अपेक्षित जागेपेक्षा सदर क्षेत्र कमी केले आहे या स्मारकासाठी सुशोभीकरणासाठी गेल्या अंदाजे दहा वर्षापासून समाज बांधवाकडूण सतत पाठपुरावा केला जात आहे मात्र स्मारका विना परिसर सुना,सुना दिसत आहे या विषयी न.प.चे मुख्याधिकारी पेंटे साहेब तथा लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी व उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार तसेच नगरसेवक केशव मुकदम यांनी तात्काळ 01 ऑगस्ट 2021जयंतीच्या दिनाच्या अगोदर अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित जागेचे सुशोभीकरण करण्यात येईल असे मातंग समाजाच्या युवकांच्या सोबत चर्चा करते वेळेस आश्वासन दिले व निवेदन देण्यात आले असून निवेदनावर मातंग समाजाचे युवा नेते शिवराज दाढेल लोहेकर टि.के.दाढेल सर. हनुमंत कंधारे. शिवहार गालफाडे. राहुल भिसे. माणिकराव दाढेल. सुभाषराव कांबळे. बाबासाहेब भिसे. केशव वाघमारे. यादव कंधारे. अजय भिसे. लक्ष्मण गायकवाड.विनायक दाढेल. किरण दाढेल. आदींनी सहया केल्या असून लवकरच स्मारकाच्या नियोजित जागेचा प्रश्न निकाली काढणार असल्याचे मा.लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी आणि लोहा न.प.मुख्याधिकारी पेंटे साहेब व उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार आश्वासन दिले आहे.