सावरगाव रस्त्यावरील वाहून गेल्याच्या पुलाची आमदार शिंदे यांनी केली पाहणी
लोहा प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसांपासून लोहा-कंधार मतदार संघात बहुसंख्य गावात अतिवृष्टीचा पाण्याने थैमान घातले असल्याचा पार्श्वभूमीवर काल गुरुवारी लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी लोहा तालुक्यातील बेरळी ,आष्टुर, रिसनगाव, सावरगाव ,माळाकोळी ,
रामतीर्थ येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून प्रशासनास अतिवृष्टीमुळे बाधित शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश यावेळी आमदार शामसुंदर शिंदे यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.
यावेळी तहसीलदार विठ्ठल परळीकर, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील ,तालुका कृषी अधिकारी घुमनवाड ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दाडगे, खरेदी-विक्री संघाचे उपसभापती श्याम पाटील पवार, संचालक सुधाकर सातपुते, माळाकोळी चे सरपंच मोहन शूर प्रमुख उपस्थित होते, यावेळी बेरळी, सावरगाव रस्त्यावरील अतिवृष्टीच्या पुराने वाहून गेलेल्या पुलाची पाहणीही आमदार शामसुंदर शिंदे यांनी करून हा पूल तात्काळ तयार करण्यासाठी प्रशासनास सूचना दिल्या.
रामतीर्थ येथील पुलावरून पाणी जात असल्याने या गावातील नागरिकांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता या पुलाची ही पाहणी काल आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.गेल्या अनेक दिवसापासून मतदार संघातील बळीराजा या ना त्या कारणाने मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिली असल्याचे आमदार शिंदे यांनी बोलताना सांगितले व लोहा कंधार मतदार संघातील शेतकऱ्यांच्या हितासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचेही यावेळी बोलताना आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले यावेळी सिद्धू पाटील वडजे,नागेश पा.खांबेगावकर,माधव बाबर,कैलास पवार,गोविंद हाफगुंडे उपस्थित होते.