कंधार प्रतिनिधी
लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांच्या हस्ते
कंधार तालुक्यातील नवरंगपुरा येथे पाच लक्ष रुपये कामाच्या सि सि रस्त्याचे लोकार्पण ही आज दि.१५ जुलै रोज गुरुवारी करण्यात आले.तसेच नवरंगपुरा येथे आशाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण सप्ताहानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमास अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख शेरू भाई, बंटी गादेकर, वसंत निलावार, वसंत मंगनाळे, नारायण मेकल वाढ, माजी उपसरपंच संभाजी मंगनाळे, तंटामुक्ती अध्यक्ष डी टी पाटील, नागेश गोधने ,विश्वंभर बसवंते, सह बहुसंख्येने गावकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते कंधार तालुक्यातील फुलवळ येथेही 15 लक्ष रुपये कामाच्या सि सि रोडचे भूमिपूजन करण्यात आले,
यावेळी सरपंच विमलबाई मंगनाळे, कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे,कंधारे वाडी चे सरपंच शंकरराव डिगोळे, मुंडेवाडीचे सरपंच माऊली मुंडे प्रमुख उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा-कंधार मतदार संघात वृक्षारोपण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याने फुलवळ येथे सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना आशाताई शिंदे म्हणाल्या की झाडांचे महत्त्व हे अनमोल असून निरोगी आयुष्यासाठी प्रत्येक नागरिकांनी एक झाड लावून त्याचे योग्य संगोपन करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित गावकऱ्यांना बोलताना आशाताई शिंदे यांनी केले, फुलवळ ग्रामपंचायतीसाठी अजून पंधरा लक्ष रुपयांचा निधी आमदार शामसुंदर शिंदे साहेबांनी दिला असून फुलवळ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी आशाताई शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले.