कंधार ; प्रतिनिधी
कंधार येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय भूमिपूजन सोहळा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. सदरील शासकीय कार्यक्रमात नांदेड व लातूर चे खासदार व मुखेड चे आमदार यांचे नावे नसल्याने भाजपा कर्यकर्त्यांनी जाब विचारताच आमदार श्यामसूंदर शिंदे व भाजपा कार्यक्रत्यात शाब्दिक चकमक उडाल्याने आमदारांनी दिलेल्या तक्रारी नंतर भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालय कंधार यांनी त्या सात जणांना अटकपूर्व जमीन मंजूर केला आहे.
दि.२८ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात भूमिपूजन सोहळा प्रसंगी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना सदरील कर्यक्रम प्रसंगी भाजपा चे तालुकाध्यक्ष भगवान राठोड व शहराध्यक्ष ॲड.गंगाप्रसाद यन्नावार यांनी नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,लातूर लोकसभेचे खासदार सुधाकर शृंगारे व कंधार मुखेड चे आमदार डॉ. तुषार राठोड यांची नावे प्रोटोकॉल नुसार नसून त्यांना निमंत्रण ही नसल्याचे प्रशासनास निदर्शनास आणून दिल्याने जाब विचारला होता.याप्रकरणी आमदार श्यामसुंदर दगडोजी शिंदे यांनी कंधार पोलिसात शासकीय कामात अडथळा केला म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड,शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार,मधुकर डांगे,निलेश गौर,बालाजी तोटावाड, व्यंकट नागलवाड, प्रकाश घोरबांड यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा या साठी ॲड दिलीप कुरुडे यांच्या वतीने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या नंतर तब्बल आठरा दिवसांनी माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.अतुल सलगर यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून सर्व आरोपींना दि १६ जुलै २०२१ रोजी शर्थीच्या आधीन राहून अटकपूर्व जमीन मंजूर केला. आरोपीच्या बाजूने ॲड दिलीप पंढरीनाथ कुरुडे यांनी
आपली बाजू मांडली व ॲड सागर डोंगरजकर यांनी या कामी सहकार्य केले ,तर फिर्यादीच्या वतीने ॲड.एन.डी. कोळनूरकर यांनी बाजू मांडली.