कंधार ; दि.१९ पालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या चौका जवळ शहराच्या मुख्य रस्त्यावर बांधण्यात येत आलेल्या व्यापारी संकुलनास महाराणा प्रतापसिंह यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी शहरातील व्यापारी व राजपूत बांधवांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्या कडे केली आहे.
अतिक्रमण हटाव मोहिमेत दुकाने पडल्याने उद्धवस्त झालेल्या विस्थापित व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी कंधार पालिकेच्या वतीने व्यापारी संकुलन बांधण्यात येत आहे. या पूर्वी ही पालिकेच्या वतीने शहरात दोन व्यापारी संकुलन बांधण्यात आलेले आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात बांधण्यात आलेल्या शॉपिंग सेंटरला बाबसाहेबांचे नाव देण्यात आले आहे. तर अण्णाभाऊसाठे यांच्या पुतळ्या परिसरात बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सला अण्णाभाऊंचे नाव देण्यात आलेले आहे. त्यांच प्रमाणे महाराणा प्रतापसिंह यांच्या चौकाच्या परिसरात (जवळ) पालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलनास महाराणा प्रतापसिंह यांचे नाव देण्यात यावे. म्हणजे पालिकेच्या परंपरे व नियमा नुसार होईल. अशी मागणी राजपूत समाज व शहरातील व्यापाऱ्यांच्या वतीने मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर योगेंद्रसिंह ठाकूर, निलेश गौर, अजितसिंह ठाकूर, अर्जुन ठाकूर, विश्वजित ठाकूर,अमरसिंह ठाकूर, जगतसिंह ठाकूर, यांच्या सह शिवकुमार मामडे, अजय मोरे, प्रमोद पदमवार, महेश महाजन, सचिन अग्रवाल,डॉ.दीपक बडवणे, डॉ. राजेश गुट्टे,डॉ. बालाजी मद्रेवार, प्रदीप व्यास, रघुनाथ इंदूरकर, राजकुमार, मुखेडकर, श्रीरंग गोटमवाड, प्रकाश नळगे, दिनेश व्यास, अमित सलमोटे, बालाजी मांगुळकर जवळपास सत्तर व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.