पंढरपुर ; प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.
यावेळी मानाचे वारकरी केशव कोलते व त्यांच्या पत्नी इंदूबाई कोलते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, त्यांच्या पत्नी सारिका भरणे उपस्थित होते.