ममता सागर ; सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे

देव हा गोरगरीब कष्टकरी शेतकरी, दीनदुबळ्यांच्या डोळ्यात असतो ही भावना नेहमी आपल्या उराशी बाळगणार्‍या व त्यानुसार दैनंदिन आचरण करणारे माजी सनदी अधिकारी तथा लोहा -कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे साहेबांच्या सुविद्य पत्नी तथा गोरगरीब कष्टकऱ्यांच्या माऊली म्हणून लोहा-कंधार मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यात अल्पावधीतच आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर लोकप्रिय झालेल्या ममता सागर सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे ह्या आपले पती विद्यमान आमदार शामसुंदर शिंदे यांच्या विचारावर पाऊल ठेवत व त्यांच्या विचारांचे आचरण करत देव हा गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या सेवेतच असतो हे जणू आशाताईंनी अवघ्या दीड वर्षाच्या अल्पकाळात लोहा-कंधार मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यात सामाजिक कार्य करून सिद्ध केले आहे.

पती आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब एक लौकिक व कर्तव्यदक्ष नेतृत्व म्हणून महाराष्ट्राला सर्वपरिचित आहेत, जिल्हाधिकारी ते महाराष्ट्राच्या परिवहन आयुक्त अशा विविध उच्चपदावर काम केलेले आमदार शिंदे साहेब यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांचे सामाजिक कार्य म्हणजे राजकारण नसून त्यांचा तो वारसाच आहे ,पती आमदार शामसुंदर शिंदे यांनी उच्च पदावर प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवा करताना ही नांदेड जिल्ह्यातील गोरगरीब युवकांना न्याय देण्याचे काम केले आहे, आशाताई चे वडील कै. गोविंदराव पाटील चिखलीकर यांचाही सामाजिक कार्यात नेहमीच मोठा सहभाग असायचा अशा कै. गोविंदराव पाटील चिखलीकर यांची लेक असलेल्या आशाताई कै. गोविंदराव पाटील व पतिराज आमदार शामसुंदर शिंदे यांच्या सामाजिक विचारांचा वारसा पुढे नेत असल्याचे वेळोवेळी दिसून येते, सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी पासून ते निकालापर्यंत आशाताईंनी जनसामान्यांशी केलेला संवाद व संपर्क आमदार शिंदे यांच्या विजयासाठी निर्णायक ठरला होता हे विसरून चालणार नाही. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निकालानंतर पहिल्यापासूनच मोठ्या ऐश्वर्यात राहिलेल्या आशाताई विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ही स्वस्थ बसल्या नाहीत, दिवसागणिक समाजातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकाळपासून संध्याकाळचे अकरा वाजेपर्यंत ही माय माऊली फक्त लोहा-कंधार मतदार संघातील गोरगरीब, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हितासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव धडपडत असताना दिसते.मोठ्या ऐश्वर्यात राहणाऱ्या आशाताई यांनी मतदारसंघातील खडतर असलेल्या शेवटच्या वाडी तांड्यावर मतदारसंघात यशस्वी स्वारी केली हे त्यांचे काम जनतेत अत्यंत कौतुकास्पद ठरलेले आहे , मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये अर्धे अधिक आयुष्य ऐश्वर्यात घालवलेल्या आशाताई लोहा -कंधार मतदार संघातील अतिदुर्गम भागातील सर्वसामान्यांचे प्रश्‍न हिरारीने सोडवण्यासाठी नेहमी अग्रस्थानी असतात .

ऐश्वर्य हे आशाताई यांच्या पायाखाली लोळण घेत असतानाही फक्त गोरगरीब ,शेतकरी, कष्टकरी समाजाचे आपण काही देणे आहोत म्हणून आशाताई आपल्या कर्मभूमितील शेतकरी, कष्टकऱ्यांच्या सेवेसाठी व हितासाठी सदैव तत्पर असल्याचे वेळोवेळी दिसते, आशा ताईंना मतदारसंघातील लोकांनी कधीही केव्हाही कितीही वाजता फोन करून समस्या सांगितल्यानंतर अत्यंत तत्परतेने आशाताई सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवतात,नंतर काम कारतायेईल अशी त्यांची भावना मुळीच नसते ,नारीकांनी समस्या सांगितल्या नंतर लगेचच त्या समसेचे तात्काळ निराकरण करतात , म्हणूनच त्यांची ओळख जिल्ह्यात ममता सागर म्हणून सर्वदूर अल्पावधीतच झाली आहे.

आशाताईंना मणक्याचा त्रास असूनही मतदार संघातील अत्यंत बिकट असलेल्या रस्त्यावरून आशाताई सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्परतेने जातात, आशाताईंनी अल्पावधीतच मतदारसंघातील लोकांना आपल्या तालुक्यातच रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून लोहा येथे आशा शेतकरी प्रोड्युसर कंपनी व् हळदा येथे गूळ उत्पादक कारखाना सुरुवात करण्याचे ठरवले व त्यांचे भूमिपूजनही मान्यवरांच्या हस्ते नुकतेच झाले , मतदारसंघात दौऱ्यावर असताना रस्त्यावर भुकेने व्याकुळ असलेल्या किंवा आजारी अवस्थेत रस्त्यावर झोपलेल्या अनाथ , गरीब व्यक्ती व अपंग व्यक्तींना आपल्या गाडीतून उतरून त्यांना आस्थेवाईकपणे मायने बोलून त्यांच्या अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय करणाऱ्या कर्तबगार आशामायला मतदारसंघातील लोक मोठ्या आशेने व कुतुहूल तेने पाहत असतात ,पुरुष वर्गाला लाजवेल असे काम आशाताई मोठया हिमतीने मतदारसंघात करत आहेत ,

,शेतकऱ्यांच्या कापसाचा प्रश्न असो ,बँकेच्या पीक विम्याचा प्रश्न ,पीक कर्जाचा विषय , सर्वसामान्यांच्या दवाखान्याचा विषय असो किंवा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचा विषय असो की महिलांचे प्रश्न असो किंवा ग्रामपंचायती स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांचे मतपरिवर्तन करण्याचा असो आशाताई या वेगवेगळ्या विषय नेहमी प्रधानण्याने सोडवलेले पहावयास मिळते.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध काढून आपल्या गावात कायम शांतता कायम राखण्यासाठी ग्रामपंचायती बिनविरोध काढण्याच्या आशाताईंच्या आवाहनाला लोहा ,कंधार मतदारमतदारसंघातील 16 ग्रामपंचायतींनी मोठा प्रतिसाद दिला ,आशाताईंच्या शब्दाला मतदारसंघात मोठा मान असल्याचे पहावयास मिळते, सार्वजनिक छत्रपती शिवजयंती महोत्सव असो की कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असो या कार्यक्रमामध्ये आशाताई चे वक्तृत्व व तडफदार भाषण ऐकण्यासाठी गावपातळीवर व शहरात मोठ्या संख्येने गर्दी होते त्यांचे कारण की आशाताई कधीही भाषणातून सर्वसामान्य जनतेला खोटे आश्वासन देत नाहीत हे त्यांचे विशेष, मतदारसंघातील जनतेला मोहित झाले आहे ,लोहा कंधार मतदार संघात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी बचत गट सक्षमीकरण करणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे, मतदारसंघातील विधवा, परितक्त्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार असून त्याचा फायदा मतदारसंघातील जनतेला येणाऱ्या काळात नक्कीच होणार असल्याचे आशाताई म्हणतात.

गेल्या मार्च 2020 महिन्यात पासून कोरोनाचे गंभीर संकट वाढले असताना आशाताईंनी लोहा, कंधार मतदार संघात व शहरात कोरोनाच्या गंभीर संकटात वाडी तांड्यावर प्रत्यक्षजाऊन गोरगरिबांना जेवनाचे वाटप केले होते, मतदारसंघातील डॉक्टरांना पी. पी .इ . कीट वाटप व लोहा , कंधार मतदार संघातील सर्व जनतेला सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले. कोरोनाच्या गंभीर संकटात लोहा ,कंधार मतदार संघातील जनतेच्या सेवेसाठी आमदार शामसुंदर शिंदे , सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे ,युवा नेते विक्रांतदादा शिंदे ,जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब पाटील शिंदे, रोहित पाटील शिंदे यांनी कोरोनाच्या संकटात सर्वसामान्य लोकांना मदत करण्यासाठी अवघ्या आ. शिंदे कुटुंबीयांनी भरभरून मदत केली होती हे विसरून चालणार नाही, आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब यांच्या मेहनतीमुळे लोहा, कंधार तालुक्यातील अत्यंत बिकट असलेल्या वाडी, तांड्यावरील रस्त्यांना आशा ताईच्या रूपाने चकाकी मिळणार आहे ,आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब व आशाताईंच्या तळमळीमुळे लोहा, कंधार मध्ये नवीन ॲम्बुलन्स, कंधारला पन्नास खाटांचे उपजिल्हा रुग्णालय ,लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरघोस निधी ,पानशेवडी प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी व बांधकामासाठी निधी ,कंधार तालुक्यातील कवठा पूलकंम बंधाऱ्याला मंजुरी, लोहा व कंधार तालुक्यातील पाच साठवण तलावाला मंजुरी व चार मोठ्या गोदामाला मंजुरी व विविध ठिकाणीच्य जीर्ण झालेल्या नवीन रस्त्याला मंजुरी अशा विविध समाजाभिमुख मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणण्यातआमदार श्यामसुंदर शिंदे हे वेळोवेळी यशस्वी होत आहेत.

आमदार शिंदे यांना आशाताईंची वेळोवेळी खंबीर साथ मिळाली आहे , लोहा कंधार मतदार संघाला एका आमदारावर एक सामाजिक कार्यकर्ते फ्री सेवा करायला मिळाले आहेत हे लोहा, कंधार मतदारसंघाचे भाग्यच आहे,आशाताईंना आराम म्हणून सध्या मिळत नसून फक्त आणि फक्त लोहा ,कंधार मतदार संघातील गोरगरीब शेतकरी कष्टकर्‍यांच्या हितासाठी काम करणे व त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम फक्त आशाताई सध्या जोमाने करत असल्याचे दिसून येते ,ग्रामीण भागातील विजेच्या समस्या असो, डीपी बसवण्याच्या समस्या असो आशाताई तत्परतेने त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करतात आशाताईंना उच्च-नीच जात भेद ,छोटा-मोठा असे कधीच मानत नसून,सर्व मानव जात म्हणजेच श्री. क्षेत्र असल्याचे समजून आशाताई मोठया हिंमतीने गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील व कटिबद्ध असतात, आशाताईवर मतदारसंघातील लाखो लोकांकडून आपल्यावर मोठ्या अपेक्षा आहेत व त्या सर्व अपेक्षा व लोहा, कंधार मतदार संघाचा सर्वांगीण विकास आपल्या हातून येणाऱ्या काळात पूर्ण होण्यासाठी आई तुळजाभवानी आपणास अधिक अधिक बळ देवो व उत्तमसदृढ आरोग्य ,ऐश्वर्य ,सुख ,समाधान धनसंपत्ती देवो हीच सदिच्छा व जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

अशोक सोनकांबळे

सिद्धार्थ नगर लोहा,जि. नांदेड

मोबा.9404673611

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *