कंधार ; प्रतिनिधी
धान फॉउंडेशन व रिलायन्स फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने कंधार तालुक्यातील कलंजियम बचत गटातील गरीब व गरजू 165 महिलांना राशन किट वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच महिलांचे काम ठप्प झाल्यामुळे कोणतेही उत्पनाचे साधन नव्हते.ज्या महिला रोज मजुरी करून पोट भरत होते, किंवा शहरात जाऊन मोल मजुरी करत होते त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.तश्यातच मायेचा आधार म्हणून रिलायन्स फॉउंडेशन ने धान फॉउंडेशन मार्फत या गरीब व गरजू महिलांना रेशन किट उपलब्ध करून दिले.
यामुळे महिलांना याचा खूप आधार मिळाला.हे रेशन किट महिलांना मिळवून देण्यासाठी रिलायन्स फॉउंडेशन चे राज्य समन्वयक श्री दीपक केकन, प्रकल्प व्यवस्थापक श्री प्रफुल बनसोड, श्री दशरथ वाळवंटे कार्यक्रम सहाय्यक यांचे खूप मोलाचे सहकार्य मिळाले. त्याचबरोबर श्री शिवानंदन सर प्रोग्राम अधिकारी, माधवी बावडे विभागीय अधिकारी धान फॉउंडेशन नांदेड यांणी खूप प्रयत्न केले.यांच्या मार्गदर्शनाखाली विकास हंडे (व्यवस्थापक),भिमकीर्ती तारू (लेखापाल), लक्ष्मीबाई आगलावे ,दैवशाला केंद्रे , कालिंदा कागणे ,अल्का गुंडे यांनी गरीब आणि गरजू महिलांना राशन किट वाटप केले.