चोळी तांडा ,मानसिंगवाडी येथे सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांची भेट

कंधार ; प्रतिनिधी

चोळी तांडा ,मानसिंगवाडी
ता.कंधार येथे सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी भेट देऊन गावातील अडीअडचणी जाणून घेतल्या. गावकऱ्यांच्या वतीने आशाताई यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी आशाताई बोलताना म्हणाल्या की,मानसिंगवाडी विकास आणि सर्व कामे लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन यावेळी सरपंच सोनूताई राठोड, शेकाप युवक जिल्हाध्यक्ष योगेश नंदनवनकर,भोजूचीवाडी सरपंच सतीश देवक्तते, तळ्याची वाडी सरपंच बाळासाहेब गर्जे,माजी सरपंच बालाजी देवकांबळे,गुट्टे सर,माधवराव राठोड,अशोक जाधव,हरी जाधव, नागेश गोधने,संतोष जाधव,दगडू पवार,केशव घुगे सह गावकरी व महिला उपस्थित होत्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *