कंधार – कंधार लोहा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीला दिवसेंदिवस बळकटी येत असून प्रस्थापित राजकारण्यांना राजकीय पक्षांना धक्का देत मराठा समाजाचे नेते माधव पाटील जाधव सुगावकर व धनगर समाजाचे नेते तथा युवा मल्हार सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख खंडुजी अकोले यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे.
कंधार – लोहा मतदार संघात वंचित आघाडीच्या बांधणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा लोहा – कंधार मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा उमेदवार शिवाभाऊ नरंगले यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार लोहा मतदार संघात पक्षाची बांधणी करण्यात येत आहे. यादरम्यान या मतदारसंघातील अनेक सक्रिय बहुजन समाजातील नेते कार्यकर्ते यांची वंचित बहुजन आघाडीकडे ओढ लागली असून आपल्या हक्कासाठी व भविष्यातील वाटचालीसाठी श्रदेय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे असून खऱ्या अर्थाने वंचित बहुजन आघाडीच वंचित बहुजनांना न्याय देईल असा विश्वास ठेवून या मतदारसंघात अनेक पक्षातील कार्यकर्ते , नेते प्रस्थापित पक्षांना लाथाडून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करीत आहेत.
आज श्रदेय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांच्या मार्गदर्शनाखाली व वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य सदस्य तथा नांदेड जिल्हा निरीक्षक चेतनभाऊ गांगुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा समाजाचे नेते माधव पाटील जाधव सुगावकर यांनी व युवा मल्हार सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख खंडूजी अकोले यांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यालय शिवालय येथे वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव श्यामभाऊ कांबळे, ज्येष्ठ नागरिक नामदेव कांबळे, सदाशिव गायकवाड, कंधार तालुका अध्यक्ष संतोष पाटील गवारे, कंधार तालुका महासचिव बंटीभाऊ गायकवाड, तालुका उपाध्यक्ष धुराजी पाटील डावळे, बबन जोंधळे, नजीर शेख, प्रवीण कछवा, चंद्रशेखर गायकवाड, अहमद पठाण, सुलतान पठाण, नयुम पठाण, युवानेते संजयभाऊ निळेकर, कपिल झडते, सुशील बनसोडे, यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रवेशानंतर मनोगत व्यक्त करताना माधव पाटील जाधव सुगावकर म्हणाले की, आपण अनेक प्रस्थापित राजकीय पक्षात काम केले आहे, परंतु अगदी स्थानिक स्वराज्य संस्था पासून या पक्षामध्ये असलेली घराणेशाही त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांना याठिकाणी न्याय मिळत नाही परंतु ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केवल वंचितांना न्याय देण्यासाठी या पक्षाची निर्मिती केली असून आपल्या न्याय हक्कासाठी व उज्वल भविष्यासाठी त्याचबरोबर बहुजन हिताय बहुजन सुखाय भूमिका घेऊन काम करणारे बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी या पक्षात प्रवेश केला असून कुठल्याही स्वार्थाशिवाय या पक्षाची आपल्या भागात ताकद वाढून असा विश्वास व्यक्त केला आहे.