अहमदपुर येथिल बाबुराव आरसुडे यांच्या घरी ब्रम्हकमळ उमलले.

अहमदपुर ( प्रतिनिधी प्रा. भगवान आमलापुरे)

येथील सेवानिवृत्त कक्ष अधिकारी तथा महात्मा फुले ब्रिगेडचे शहर उपाध्यक्ष श्री बाबुराव नामदेवराव आरसुडे यांच्या राहत्या घरासमोरील बागेत गुरु पोर्णिमेच्या दिवशी ब्रम्हकमळ उमलले.

अधिक माहिती अशी की अहमदपूर येथील थोडगा रोडवरील नागेश काँलनीत, लक्ष्मी टाँकीज जवळ श्री बाबुराव आरसुडे यांचे हरिओम निवास हे घर आहे. ते सेवानिवृत्त कक्ष अधिकारी आहेत. त्यांच्या परसबागेत दि २३ जुलै २१ रोजी, गुरु पोर्णिमेच्या मुहूर्तावर रात्री १२ : ०० वाजता ब्रम्हकमळ उमलले.

गुगलवरील ब्रम्हकमळाविषयची माहिती असी ब्रम्ह कमळ हे कँक्टस वर्गातील एक एक झुडूप आहे. कँक्टस वर्गातील असुनही त्याच्या पानांना काटे नसतात. पाने मांसल, लांबट, पोपटी हिरव्या रंगाची असुन त्याला पानावरच पावसाळ्यात वर्षातून एकदा खूप मोठ्या आकाराची पांढऱ्या शुभ्र रंगाची सुगंधित फुले येतात. त्याचे वैज्ञानिक नाव Epiphyllum Oxypetalum असे आहे.

सर्व साधारणपणे झाडाला – वेलीला प्रथमतः तोर, मोहोर येतो. नंतर फुलं उमलतात. कळ्या येतात आणि फुल धरते. पण ब्रम्ह कमळाच्या पानासच कळी येवून फुल उमलते.

निसर्गाच्या या अदभूत चमत्काराला मानवी प्रतिसाद देत श्री व सौ आरसुडे यांनी किरायादार आणि शेजारच्या सुहासिनींना पुजा ,आरती प्रसाद आणि ओटी भरण्यासाठी आमंत्रित केले. त्या ०७ सुहासिनींनी ब्रम्ह कमळाची विधीवत पुजा केली.

यात सौ दमयंती बा आरसुडे , सौ क्रष्णा वि गबाळे, सौ चंद्रकला प्र कंदगुळे, सौ सरोज मो सगर ,सौ अन्नपूर्णा भ आमलापुरे, सौ अरुणा शं भदाडे आणि चौथराताई रा गायकवाड यांचा समावेश होता.सदरील ब्रम्ह कमळाचं रोपटं दोन वर्षापूर्वी अहमदनगर येथून आणून आपल्या बागेत लावले आहे. असे सौ दमयंती आरसुडे यांनी सांगितले.

     शेवटी एक गोष्ट खरी की उत्सवप्रीय माणसांनी तासभर एकत्र येऊन निसर्गाच्या जवळ जात, त्याचे गुणगान गात निसर्ग पुजन केले.म्हणून प पु साने गुरुजींची माफी मागून आणि त्यांच्या शब्दात थोडा बदल करून म्हणावे वाटते,

    निसर्ग माझा गुरु
     निसर्ग कल्पतरू.
     त्याचे करूया पुजन
      त्याला करूया वंदन.
   कार्यक्रमाच्या शेवटी,  

निसर्गा आम्ही पुजीले ‘

असा भाव श्री आणि सौ आरसुडे यांच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसत होता.

    यावेळी  घरमालक बाबुराव आरसुडे ,विठ्ठलराव गबाळे सावकार, मोहनराव सगर, प्रकाश कंदगुळे ,प्रा भगवान आमलापुरे, रामकिशन गायकवाड, महेश कंदगुळे आणि पवन गायकवाड   उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *