कंधार ; प्रतिनिधी
श्री शिवाजी विद्यालय बारूळ येथे मातोश्री मुक्ताई पुण्यतिथी व डॉक्टर केशवराव धोंडगे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त आज दि.२६ जुलै रोजी शाळेमध्ये भव्य रक्तदान शिबिर ठेवण्यात आले. याप्रसंगी अवघ्या कमी वेळामध्ये पंचवीस लोकांनी रक्तदान केले.
यावेळी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव तथा माजी आमदार भाई श्री गुरुनाथरावजी कुरडे यांची उपस्थिती होती व प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रा. पुरुषोत्तम धोंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्था सदस्य प्राध्यापक वैजनाथराव कुरुडे, माधवराव पेटकर ,कॉलेजचे क्रीडाशिक्षक चिवडे सर यांची यावेळी उपस्थिती होती .कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक अनिल वट्टमवार, उपमुख्याध्यापक बसवंते यांच्या नियोजनाखाली सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने संपन्न झाला.
यावेळी अध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तम धोंडगे यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले की कोरोणा काळात रक्ताचे खूप महत्त्व असून ते महत्त्व ओळखून श्री शिवाजी विद्यालय बारूळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून पंचवीस ते तीस लोकांचे रक्तदानातुन तेवढेच जीवनदान केले गेले तसेच या नंतर मोठ्या प्रमाणात संस्थेच्या वतीने मोठे शिबिर घेण्याचे अभिवचन दिले. सूत्रसंचालन सोनटक्के सर व आभार अरुण कौशल्य यांनी मानले.