कारगिल युद्धात सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांच्या हस्ते सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

आज दि.२६ जुलै रोजी तहसील कार्यालयात व्यंकटेश मुंडे तहसीलदार व गटविकास अधिकारी बळवंत व नायब तहसीलदार नयना कुलकर्णी मॅडम यांच्या उपस्थितीत तालुक्यातील कारगिल युद्धात सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा सत्कार करून कारगिल विजय दिन साजरा केला.

आज दि.२६ जुलै रोजी कारगील विजय दिन आहे.त्यानिमित्ताने तहसिलदार व्यंकटेश मुंडे याःनी सदरील सत्कार सोहळा तहसिल कार्यालयात आयोजित केला.होता.यावेळी कंधार तालुक्यातील माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी ,जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *