कंधार ; प्रतिनीधी
माजी सैनिक संघटना शाखा कंधार च्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात कारगिल युध्द विजय दिवस २६ जुलै दिनी भारत मातेचा जयजयकार करत कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.कारगिल युद्धात प्रत्यक्ष लढणा-या माजी सैनिक कॕप्टन के.आर कपाळे,कॕप्टन सुभाष कस्तुरे यांनी ६० दिवसांच्या युद्धाचे रोमहर्षीत घटनेचे कथन करत आठवणींना उजाळा देण्यात आला.
२० मे १९९९ रोजी कारगिल युध्द चालु झाले हे युध्द सुमारे ६० दिवस चालले होते.यामध्ये ५३७ च्या जवळ भारतीय जवान शहिद झाले.
२६ जुलै रोजी हे युध्द संपले आणि या युध्दात भारत विजयी झाला या विजयाचा जल्लोष म्हणून संपुर्ण देशभरात कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
माजी सैनिक संघटनेच्या वतीने कारगिल युध्द दिवस विजय दिन म्हणून दरवर्षी साजरा करुन शहिद जवानांना जध्दांजली वाहण्यात येते.
कारगिल युध्दाला आज सुमारे २२ वर्ष पुर्ण होत आहेत.कारगिल युध्दात भारत विजयी झाला असल्याने यांचा जल्लोष म्हणून माजी सैनिक संघटनेच्या वतिने शिवाजी चौक कंधार येथे कंरण्यात आला.फट्याक्याची अतिश बाजी करुन हा विजय दिवस साजरा करण्यात आला. तसेच शहिद जवानांना भावपुर्ण श्रध्दाजंली वाहण्यात आली.
या श्रध्दाजंली कार्यक्रमास कारगिल युध्दात प्रत्यक्ष सहभागी असलेले कॕप्टन के.आर कपाळे,कॕप्टन सुभाष कस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.भारत माता की जय,पाकिस्तान मुर्दाबाद या घोषणाने परिसर दणावला होता.शहिद जवानांना श्रध्दाजंली वाहण्यासाठी सैनिक सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड , कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोसीकर,माजी नगरसेवक गणेश कुंटेवार,भाजप शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार,राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहरध्यक्ष राजकुमार केकाटे ,रमेश देशमुख ,नितीन कोकाटे,यांनी शहिद जवानाला अभिवाद केले.
कारगिल युध्दात सैनिकांना ६० दिवस कसा संघर्ष करावा लागला या विषयी कॕप्टन के.आर कस्तुरे यांनी आपले भयावह अनुभव ,यातना सांगितले. यावेळी कॕप्टन कस्तुरे म्हणाले की,कारगिल युध्दात कधी सैनिक शहिद होईल हे सांगता येत नव्हते.कधी गोळे कुठुण येतील हे कळत सुध्दा नव्हते. दोन महिणे बर्फात कसे काढले हे आम्हालाच माहित आहे.रात्री झोपी जायच म्हटलं तर अंगातली थंडी जात नव्हती त्यामुळे झोप सुध्दा लागत नव्हती. भारतातील नागरीकांनी खुप प्रेम दिल.अन्यधान्ये कपडे दिले.बहिणीनी राख्या पाठवल्या या सर्वांच्या आशीर्वादाने व सरकारने सैनिकांना सर्व आधिकार दिले असल्याने आम्ही युध्दास सामोरे गेलो आणी ६० दिवसाच्या संघार्षा नंतर हे युध्द आम्ही जिंकलो..सैनिक हा पैशासाठी काम करत नसुन भारत मातेच्या रक्षणासाठी काम करत असतो त्यामुळे त्यांना सन्मानाची वागणुक द्या.असे प्रतिपादन के.आर कस्तुरे यांनी यावेळी केले.
माजी सैनिक संघटनेच्या वतिने कारगिल विजय दिवस हा कार्यक्रमाचे आयोजन माजी सैनिक संकटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी केले होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्जुन कांबळे तालुका अध्यक्ष ,शेख आजीज तालुका उपाध्यक्ष,पोचीराम वाघमारे तालुका सचिव,माजी सैनिक कल्याणकर आदीनी यावेळी परिश्रम घेतले.