कंधार तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते व पुलाची सौ.आशाताई शिंदे यांनी केली पाहणी

कंधार( प्रतिनिधी)
कंधार तालुक्यातील भोजुचीवाडी येथे अतिवृष्टीमुळे पुलाची दुरवस्था झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल सोमवारी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी या पुलाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना हा पूल तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या, यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जोशी, इंजि. पवार ,शेकाप युवक जिल्हाध्यक्ष योगेश नंदनवनकर,सरपंच सतीश देवक्तते, सरपंच बाळासाहेब गर्जे,माजी सरपंच बालाजी देवकांबळे, कोंडीबा मोरे,गौळ उपसरपंच उद्धवराव गुट्टे सह पदाधिकारी उपस्थित होते .

कंधार तालुक्यातील मानसिंग वाडी येथील गावला नदीवर पूल नसल्यामुळे या गावचा तालुक्याची संपर्क तुटला होता या ठिकाणची पहाणी आशाताई शिंदे यांनी करून आमदार शिंदे यांच्या निधीतून लवकरात लवकर या गावला पूल बांधण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सौ शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले. यावेळी आशाताईंनी मानसिंग वाडी व चोळीतांडा येथील गावकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन मानसिंग वाढीच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शामसुंदर शिंदे कटिबद्ध असल्याचे गावकऱ्यशी बोलताना आशाताईंनी सांगितले ,यावेळी गावकऱ्यांच्या वतीने आशाताई त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच सोनू ताई राठोड, सरपंच सतीश देवकते ,गुट्टे सर, माधव राठोड ,अशोक जाधव, चुडाजी कागणे ,अवधूत पेठकर, महेश पिनाटे ,उपसरपंच उद्धव गुट्टे शिवराज तेलंग ,सुधाकर राठोड सह कार्यकर्ते, पदाधिकारी, गावकरी मोठ्या संख्येने सामाजिक अंतराचे पालन करत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *