कंधार ; प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधुन संपुर्ण महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियांन राबवल्या जात आहे.नांदेड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आंनद जाधव व खासदार हेंमत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण नांदेड जिल्ह्यात शिव संपर्क अभियांन राबवल्या जात आहे.लोहा -कंधार तालुक्यात ही जिल्हाप्रमुख आंनदराव बोंढारकर यांच्या प्रमुख उपस्थित तालुक्यातील अनेक गावात शिव संपर्क अभियान राबविण्यात आले.
गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक निर्माण करुन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदार संघावर पुन्हा भगवा फडकविण्यासाठी हे अभियांन राबवल्या जात असल्याची माहीती अॕड.मुक्तेश्वर धोंडगे व बाळासाहेब कऱ्हाळे यांनी दिली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधुन संपुर्ण महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियांन राबवल्या जात आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकुन अखंड महाराष्ट्र भगवा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिव संपर्क अभियान राबवुन शिवसैनिकांची सदस्य नोंदणी केल्या जात आहे.आज कंधार येथिल शासकीय विश्राम गृह येथे शिव संपर्क अभियान या कार्यक्रमाचे शहरप्रमुखा धनराज लुंगारे यांच्या वतिने आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आंनदराव बोंढारकर,अॕड.मुक्तेश्वर धोंडगे, बाळासाहेब कऱ्हाळे ,बाबाराव शिंदे,गणेश कुंटेवार माधव मुसळे ,उत्तम चव्हाण ,सत्यनारायन मानसपुरे,संजय ढेपे,संजय ढाले,मिलिद पवार,स्वप्निल गारोळे,चंद्रकांत आडगावकर,आदिची उपस्थिती होती.
कंधार तालुक्यातील शिराढोण सर्कल, दहिकळंबा ,हळदा राऊतखेडा, औराळ, लाठ, कंधार, संगमवाडी पानभोसि या गावासह अनेक गावात शिव संपर्क अभियान राबविण्यात आले. गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक निर्माण करुन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदार संघावर पुन्हा भगवा फडकविण्यासाठी हे अभियांन राबवल्या जात आसुन येणाऱ्या काळात प्रत्येक निवडणुक ही शिवसेनेना सर्व ताकती नुसार लढवणार असल्याचा एल्लगार या शिवसंपर्क अभियांनातुन केला आहे.या शिव संपर्क अभियांनातुन अनेक कार्रकृत्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे.
खासदार चिखलीकर यांना नऊ महिन्याला मंत्री पदाचे डोहाळे लागत. -बाळासाहेब कऱ्हाळे
सध्या शिवसंपर्क अभियांन चालु असुन औराळ येथे शिवसेनेच्या शाखा स्थापन करण्यात आली यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना शिवसेना युवा नेते बाळासाहेब कऱ्हाळे म्हणाले की दाजी भावजीने मतदार संघाचे वाटोळे केले आहे.आज हे दाजी भावजी एकमेकांवर टिका करुन जनतेला फसवण्याचे काम करत आहेत.हे दाजी भावजी एकाच माळेचे मनी असुन हे एकच आहेत. मी अनेक वर्ष खा.चिखलीकर यांच्या सोबत काम केल आहे त्यामुळे त्यांनी मतदार संघासाठी काय दिवे लावले हे मला चांगलेच माहीत आहे.खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी फक्त सत्ता पाहीजे.गेल्या अनेक वर्षापासुन ते मंत्रीपदासाठी परिशान आहेत. कार्यकृर्त्ये टिकवण्यासाठी त्यांना नऊ महिन्याला मंत्री पदाचे डोहाळे लागत असतात .अशा लोकांना विश्वास न ठेवता आता या मतदार संघाला शिवसेने शिवाय पर्याय नाही .त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवा असे अहवान बाळासाहेब कऱ्हाळे यांनी केले आहे.