कंधार
तालुक्यातील चिखली ते औराळा रस्त्यावरील पुलाचे काम गेल्या दिड ते दोन वर्षापासुन रखडले असून यामुळे वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना दि.१४ रोजी राहुल गांधी विचार मंच नांदेड च्या वतीने निवेदन देण्यात आले.
मौजे चिखली पसून ५००
मी.अंतरावर अर्धवट राहीलेले पुलाचे काम गेल्या १८ महिन्यापासून बंद आहे. त्या पुलामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकिला अडथळा निर्माण होत असून पावसाळ्यात कंधार जाणाऱ्या , नांदेड जाणाऱ्या वाहनास आणि शेतात जाणाऱ्या
शेतकन्यांना त्याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तरी मा.नामदार अशोकरव चव्हाण साहेबांनी गांवक-यांच्या सोयीसाठी संबधित कामाच्या अधिकाऱ्यांना इतर लोकांना पुलाचे काम करण्यास
आदेशित करून सहकार्य करावे असे निवेदन दि.१४ अॉगस्ट रोजी
राहुल गांधी विचार मंच युवा नांदेड जिल्हा अध्यक्ष अशोक मनोहरराव पाटील चीखलीकर यांची स्वाक्षरी आहे.