लोहा ; हरिहर धुतमल
लोह्यातील नामांकित व्यापारी ..हसतमुख ..सतत मित्रपरिवारांच्या सहवासात राहणारे… एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व गोपाळ सावकार कोटलवार यांचे आज शुक्रवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांचे वय 60वर्ष होते.पाच भाऊ, बहीण पुतणे, सुना असा मोठा सुसंकृत परिवार आहे
अचानक त्यांची एक्झिट एक मोठी धक्का देणारी ..मनाला चटका लावून गेली.मॉर्निंग ग्रुपचे ते नित्याचे सोबती.डॉ कानवटे साहेब,माजी नगराध्यक्ष किरण सावकार वटटमवार, पोटपल्लेवार साहेब, विक्रम कदम सर, अशी सगळी मित्र मंडळी आवर्जून सकाळी मॉर्निंग वॉक करत होते आता त्यांचा एक हसतमुख सोबती गेला..
माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम ,किरण सावकार , रामभाऊ ,चन्नावार, वसंतराव पवार, दिनेश तेललवर, बाळू सावकार पालिमकर, प्रा डॉ डि एम पवार, नागनाथ मोटरवार, हरिभाऊ चव्हाण,दता वाले प्रदीप निलावार , , शेषराव काहळेकर असा मोठा मित्रपरिवार त्यांचा होता .सतत हसतमुख असणारे गोपाळ सावकार कर्तृत्ववान पिता होते.थोरला मुलगा पुणे येथे इंजिनीअर , धाकटा मुलगा हृद्यरोग फिजिशियन ( एमबीबीएस एमडी) सून डॉक्टर, नातवंडे असा सुखी समाधानी कुटुंब.
१९९३ च्या नगरपालिका निवडणूकीत मोंढा भागातून ते अवघ्या पाच मतांनी पराभूत झाले रामभाऊ चन्नावार विजयी झाले होते त्यानंतर मात्र गोपाळ सावकार यांनी कधीच निवडणूक लढविली नाही पण राजकीय मित्र परिवार मोठा .माजी आ रोहिदास चव्हाण, माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सूर्यवंशी , त्यांचे मित्रपरिवार
चिखलीकर साहेब व गोपाळ सावकार यांची कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध . दोघांची मैत्री निखळ होती.लोह्यात चिखलीकर साहेब आले की गोपाळ सावकार याना न चुकता विचारत .मागील काही दिवसां पूर्वीच या लॉक डाऊन काळात खासदार साहेबानी गोपाळ सावकार , ‘बरेच दिवस झाले जेवायला केले नाही तेव्हा साहेब, तुम्ही सांगा कधी करू ते ‘ असे गोपाळ सावकार बोलले .चिखलीकर साहेबांचा शब्द कधीच खाली न पडू दिला नाहीं .पण आता ..उरल्या त्या आठवणी..
गोपाळ सावकार यांच्या जाण्याची बातमी खूपच क्लेशदायक ठरली .माजी नगरसेवक वसंत वाघमारे यांची एक्झिट अशीच हळहळ लावणारी होती त्याचीच काळाने पुनरावृत्ती केली
एक हसतमुख, निखळ मैत्री जपणारा आणि सर्वाना हवाहवासा वाटणारा मित्र, कर्तृत्ववान पालक, यशस्वी व्यापारी असे व्यक्तिमत्त्व सर्वाना सोडून गेले .