कंधार ; प्रतिनिधी
दि २५/०७/२०२१ रोजी संयुक्त ग्रुप कंधार तालुक्याच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे संस्कृतिक सभागृह साठे नगर,कंधार येथे दुपारी १२ : ०० वाजता बैठक संपन्न झाली.
बैठकीमध्ये विविध सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली व संयुक्त ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ मळगे यांनी संयुक्त तक्रार निवारण अभियाना विषयी संपूर्ण माहिती दिली . येणाऱ्या काळात कशा पद्धतीने काम आपल्याला ग्रुपच्या माध्यमातून करायचं आहे ते सांगण्यात आले.
यावेळी उपस्थित :- संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य चे संस्थापक/अध्यक्ष साईनाथ भगवानराव मळगे, दक्षिण चे युवा जिल्हाध्यक्ष अमोल मोरे , संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य शाखा कंधार चे तालुका अध्यक्ष विजेंद्र मिलिंद कांबळे, प्रसिद्धीप्रमुख सचिन वाघमारे, युवा ग्रामीण तालुका अध्यक्ष आकाश गुंडे , संयुक्त तक्रार निवारन अभियानाचे धर्मापुरीचे अध्यक्ष तिरुपति ईंगळे , युवा तालुका अध्यक्ष धनराज भाऊ टोंम्पे, नामदेव डुबूकवाड शहर प्रसिद्धीप्रमुख व समस्त पदाधिकारी उपस्थित होते.