नांदेड ; ( विशेष प्रतिनिधी रूचिरा बेटकर )
गुरुपौर्णिमा निमित्त जीवनातील विविध क्षेत्रातील कार्यरत असलेल्या आपल्या ज्ञानाने, कर्तृत्वाने, सेवा, प्रबोधनाच्या माध्यमाने समाजजागृती, समाजाला एकत्र तत्वात बांधून ठेवणार्या सर्व गुरुजनांचा सत्कार अभिनव विचार मंचाच्या वतीने _शाल, श्रीफळ व गुरुगौरव पत्र देऊन करण्यात आला.
अध्यात्मिक क्षेत्रातील कोलंबी येथील अखंडपणे समाजाला एकत्र बांधून ठेवणारे श्रेष्ठ गुरुवर्य गादी दत्त मठ संस्थान कोलंबी, असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान गुरुवर्य महंत यदुबन महाराज, लोककला क्षेत्रातील सुजलेगाव येथील लोककला, लोकसाहित्य, शाहिरी, संत गाडगे महाराज यांचा वारसा महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही ज्यांनी गेली चाळीस वर्षे अविरतपणे पोहोचवीत आहेत असे जेष्ठ कलावंत,प्रबोधनकार शाहिर दिगु तुमवाड , साहित्य क्षेत्रातील कुंटूर येथील साने गुरुजी विचार मंचच्या माध्यमाने गेली दहा वर्ष ज्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजकार्य, सर्वधर्मसमभाव, सेवा ही भावना तरुणांच्या मनात रुजवून बाबा आमटे यांच्यासारख्या समाज श्रेष्ठ समाज ऋषी यांचा वारसा पुढे नेणारे आणि सतत समाजकार्यासाठी धडपडणारे तरुण साहित्यिक, कवी, लेखक, शिक्षक प्रा. बाळू दुगडूमवार
समाजकार्य क्षेत्रातील
बरबडा येथील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, साधी राहणी उच्च विचारसरणी व राज्य पुरस्कारप्राप्त शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा संगीत या विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणारे आणि समाजकार्यासाठी सर्वांच्या पुढे असणारे समाजसेवी ज्यांनी प्रत्येक रक्तदान शिबिर मध्ये नेहमी सहकुटुंब सहपरिवार मिळून रक्तदान हे श्रेष्ठ दान समजून आत्तापर्यंत सतरा वेळेस रक्तदान केले. अशा नागोराव तिप्पलवाड (एन. टी. तिप्पलवाड ), आणि शैक्षणिक क्षेत्रातील बाराळी येथील ज्यांनी स्वखर्चातुन विध्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी निरंतर प्रयत्न करत असलेले, गरीब होतकरू विध्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत करून मुलांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण करणारे विध्यार्थीप्रिय माजी मुख्याध्यापक पाटील सर यांचा व ईतर क्षेत्रातील कार्यरत असलेल्या गुरुजनांचा गुरुपौर्णिमानिमित्त अभिनव विचारमंच नायगाव च्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री आनंद पांचाळ , श्री अशोक कानगुले , श्री अर्जुन बैस, श्री विठ्ठल पांचाळ , श्री गजानन होकर्णे व माझा प्राणप्रिय श्री महेश बडूरे यांनी सत्कार केला.
यावेळी बरबडा येथील सरपंच माधवराव कोलगाने हे उपस्थित होते व त्यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला. अभिनव विचार मंच च्या टीमचे मनःपूर्वक आभार मानले सदैव तुमच्या ऋणात राहीन व मला आपण समाजसेवेची संधी दिली आणि आणखी काम करण्याची जबाबदारी वाढवली मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझी अविरत पणे सेवा करत राहीन असे प्रतिपादन माधवराव कोलगाने यांनी केले.
स्नेह असा हा….
आपुलकीचा सूर आपला
नयनांना आज दिसला।
सूरात सूर मिसळूनी
ऊर माझा हसला॥
स्नेह असा हा लावी लळा
जपू अपुलेपणाच्या माळा।
आशिष आपला लहान थोरांचा
मनोमनी मला भावला॥
आश्वस्थ असणार मी
जाणार नाही तडा ॠणाला।
श्रृंखला वाढविण्या तत्पर
जपेन शक्यतो विश्वासाला॥
नागोराव तिप्पलवार ,या.बरबडा,जि.नांदेड यांनी सर्व अभिनव विचार मंच या टीमचे आभार मानले.