कंधार ; प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी शहराध्यक्ष व तालुक्याच्या वतीने कंधार येथे शर्करा तुला करण्यात आली.
युवकांचे हृदय सम्राट असणारे गोर,गरीब सर्व सामान्य जनतेला आपल्या पदाच्या माध्यमातून राजकारण नकरता सामाजिक भावनेने जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करुन नेहमीच न्याय देण्याचे काम केले आहे दिलीपदादा धोंडगे यांच्या वाढदिवसानिमित्त कंधार राष्ट्रवादी शहराध्यक्ष व तालुक्याच्या वतीने शर्करा तुला करण्यात आली कार्यक्रमचे अध्यक्ष शिवदास पाटील धर्मापुरीकर हे होते तर प्रमुख पाहुणे मनोहर पाटील भोसीकर,अँड.विजय धोंडगे,सुभाष पाटील वाकोरे, दत्ताभाऊ कारामुंगे,शिवराज पाटील धोंडगे,सुभाष राहेरकर,सुधाकर पाटील मोरे,सुरेश शिरसे,चेअरमन माधव पाटील कदम,न्यानोबा घुगे,माधव पाटील मोरे,संतोष कागणे होते.
कार्यक्रमचे संयोजक शहराध्यक्ष तथा संचालक राजकुमार केकाटे यांनी दिलीपदादा यांचा सत्कार व सन्मान करुन शर्करा तुला केली.
यावेळी प्रा.शिवराज मंगनाळे,पिंटु कदम,माऊली टेलर,आरुन करेवाडी,भगवान घोडके,मोरे,लखन कहाळेकर, राज पवार लईक शेख,राहुल आगलावे,अनिल मोरे,भरत चिखलीकर,शरद भागानगरे,कारामुंगे व इतर शकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गोतम पवार यांनी केले तर आभार शहराध्यक्ष तथा संचालक राजकुमार केकाटे यांनी मानले.