कंधार ; प्रतिनिधी
नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कंधार येथे भारतीय जनता युवा मोर्च्या च्या वतीने आज दि.३१ जुलै रोजी शेतकऱ्यांना झाडे वाटप करण्यात आले.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या जन्मदिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्च्या च्या वतीने सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे या अनुषंगाने कंधार येथे खासदार चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. भारत मातेचे पुजन करून युवा मोर्चा कंधार च्या वतीने दि ३१ रोजी १०१ वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले .
यावेळी कंधार नगरपालिका उपनगराध्यक्ष महंमद जफरोद्दीन भाजपा कंधार तालुका अध्यक्ष भगवान राठोड, कंधार भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष साईनाथ विश्वनाथ अप्पा कोळगीरे, भाजपा शहराध्यक्ष अँड गंगाप्रसाद यन्नावार, नांदेड भाजपा उपाध्यक्ष निलेश गौर, भाजपा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष राजहंस शहापुरे, भाजपा सरचिटणीस मधुकर पाटील डांगे, भाजपा सरचिटणीस विनोद तोरणे, भाजपा कंधार उपाध्यक्ष उमेश शिंदे, उपाध्यक्ष चेतनभाऊ केंद्रे, शिंदे सर, पत्रकार रवी कांबळे, प्रल्हाद आगबोट,रजत शहापुरे, बालाजी तोरणे,कांतराव आगलावे, राजीव मुकनर, व्यंकटराव नागलवाड, माणिक बोरकर, महेश मोरे ,गंगाधर गायकवाड,कुनकेमामा, सखाराम लाडेकर, सतिश कांबळे,गिरमाजी कांबळे, नागनाथ श्रीमंगले, श्रीराम जाधव,आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.