अहमदपूरकरांनी केले वसंतराव नाईक यांना क्रतीशील अभिवादन.


अहमदपूर ( प्रतिनिधी ) येथील वसंतराव नाईक ग्रामीण विकास लोकसेवा संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त विस्तार अधिकारी एन डी राठोड आणि त्यांच्या सोबतच्या इतर १० – १५ कार्यकरत्यांनी वसंतराव नाईक यांची जन्मभुमी, गहूली येथे जाउन, १ जुलै, जयंतीच्या पाश्र्वभूमीवर त्यांच्या कार्यास क्रतीशील अभिवादन केले.


हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं जन्मगाव गहूली ता पुसद जिल्हा यवतमाळ. गुरुवार दि २९ जुलै २१ रोजी येथील वसंतराव नाईक ग्रामीण विकास लोकसेवा संस्थेचे अध्यक्ष एन डी राठोड यांच्या कल्पनेतून आणि संयोजनातून १० – १५ कार्यकर्ते पोहरादेवी येथे गेले. परतीच्या प्रवासात वसंतराव नाईक यांच्या जन्मगावी, गहूली येथील स्मृती स्थळावर जाऊन त्यांच्या कार्याला क्रतीशील अभिवादन केले.


महानायक वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातील सर्वागीण विकासाची ओळख सबंध महाराष्ट्राला व्हावी ,म्हणून दि ०१ जुलै,जयंतीपासून ते १८ आँगस्ट, स्मृतीदिनापर्यंत, ४८ दिवसाची प्रदिर्घ व्याख्यानमाला बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेने चालू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा काढण्यात आला होता. यात एन डी राठोड, शेषराव राठोड – सरपंच नांदुरा खु, एच आर राठोड, पंडित चव्हाण तोंडापूरकर, नरवटवाडीचे ग्रामपंचायत सदस्य राम राठोड, राष्ट्रवादीचे शाखा अध्यक्ष गोविंद राठोड, प्रा भगवान आमलापुरे, सिद्धनाथ पवळे, धोंडीराम राठोड, आर आर राठोड यांचा समावेश होता.


सर्व प्रथम पोहरादेवीचे दर्शन, क्रांतीगुरु रामराम महाराज, सेवालाल महाराज यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून नंदी देवस्थानचे दर्शन घेतले. त्या नंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, महानायक वसंतराव नाईक यांच्या स्मृती स्थळावर जाउन त्याच्या कार्यास क्रतीशील अभिवादन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *