माळाकोळी येथील पाणीपुरवठा योजनेचा मार्ग सुकर पाणीपुरवठा मंत्री ना. संजय बनसोडे यांचे आश्वासन

माळाकोळी ; एकनाथ तिडके

लोहा तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या माळाकोळी गावचा लिंबोटी धरणहून पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी सरपंच मोहन काका शूर व त्यांची टीम प्रयत्नशील आहे याचाच भाग म्हणून त्यांनी आमदार श्यामसुंदर शिंदे , जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा राज्यमंत्री ना. श्री संजय बनसोडे यांची भेट घेतली, यावेळी मंत्रीमहोदयांनी माधुरीच्या पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भाने सकारात्मक चर्चा केली.


पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठ्या माळाकोळी गावाचा मागील अनेक वर्षांपासून पाणीपुरवठ्याचा प्रश्न मात्र कायम प्रलंबित राहिला आहे,अनेक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांनी आश्वासने देऊनही येथील प्रश्न कायमस्वरूपी मार्गी कधीही लागला नाही यामुळे माळाकोळी येथील सरपंच मोहन काका शूर , उपसरपंच निखिल मस्के, पंचायत समिती सदस्य जनार्दन तिडके, ग्राम पंचायत सदस्य केशव तिडके, यांनी आमदार शामसुंदर शिंदे व जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा राज्यमंत्री ना संजय बनसोडे यांची भेट घेऊन सदर योजनेचा मंजुरीसाठी साकडे घातले यावेळी मंत्रीमहोदय ना संजय बनसोडे यांनी तातडीने संबंधित विभागांना माळाकोळी पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश दिले.ना.संजय बनसोडे यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे माळाकोळी येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरच निकाली लागणार आहे.
यावेळी कंधार लोहा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब , जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील , सरपंच प्रतिनिधी मोहन काका शूर, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी जनार्धन तिडके,उपसरपंच निखिल मस्के, ग्रामपंचायत सदस्य केशवराव तिडके , आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *