कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील मौजे इमामवाडी येथील मयत शेतकरी संभाजी विठ्ठल जिंके ४५ यांच्या परिवाराला (सहानुगृह) आर्थिक मदत मिळावी व त्याचे सर्व बँकेचे कर्ज माफ करण्यात यावे अशी मागणी दि,३० जुलै रोजी संयुक्त ग्रुप कंधार तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष विजेंद्र कांबळे यांनी तहसिलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
कंधार तालुक्यातील मौ. इमामवाडी येथील मयत संभाजी विठ्ठल जिंके वय ४५ वर्ष हा शेतकऱ्यांच्या नावे अडीच एकर शेती असून सतत च्या नापिक व बँकेच्या कर्जाला कंटाळून त्यांनी मंगळवार दि – 27 जुलै रोजी स्वतः च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून घेऊन आत्महत्या केली होती.या बाबीचा विचार करुन संयुक्त ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष साईनाथ मळगे यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार शाखेच्या वतीने तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांना निवेदन देवून मयत संभाजी विठ्ठल जिंके यांनी घेतलेल्या विविध बँकेचे कर्ज माफ करावे व सानुगृह मदत करावी अशी मागणी केली आहे.या निवेदनावर कंधार तालुकाध्यक्ष विजेंद्र कांबळे,संयुक्त तक्रार निवारण आभियान तिरुपती इंगळे,मारुती पिराजी इंगळे, अशोक नामदेव इंगळे, संदीप तुकाराम इंगळे आदीच्या स्वाक्षरी आहेत.