माजी सैनिक संघटनेच्या पुढाकारा नंतर दोन टप्यात वेतन देण्याचे मुख्यधिकारी यांचे अश्वासन
कंधार ; प्रतिनीधी
कंधार शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जवळपास 25रोजनदारी कर्मचारी काम करत असुन शहराचा पाणीपुरवा हा रोजनदारी कर्मचारी यांच्यावर अवलंबून आहे.या कर्मचाऱ्यांचे गेल्या सात महिन्यापासुन वेतन मिळाले नसल्याने यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने हे कर्मचारी मेटीकुटीला आले आहेत.सध्या माजी सैनिक संघटना चर्चेत असल्याने या कर्मचाऱ्यांना बालाजी चुकुलवाट यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या असता माजी सैनिकांनी मुख्यधिकारी विजय चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली आसता तिन टप्पात वेतन देण्याचे अश्वासन दिले आहे.
कंधार शहराला पाणी पुरवाठा करणारी मन्याड नदी व लिंबोटी धरण तुंडुब भरुन असताना सुध्दा कंधारकरांना दोन दिवस आड पाणी पुरवठा होत आहे.शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी अंदाजे 25ते 28कर्मचारी आहेत.शहराला पाणी पुरवठा करण्याचे कामाच रोजनदारी कर्मचाऱ्यांच्या हाती आहे.आनेक वेळा लिंबोटी धरणावरुन शहरासाठी पाणी सोडणिरे कर्मचारी वेतन मिळाले नसल्यामुळे काम बंद केले होते त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा खोळबंला होता.रोजनदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फक्त पाच हजार वेतन आहे.असे असतानाही नगर पालीकेकडुन यांना वेळेवर वेतन दिले जात नसल्यने यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.या संदर्भात अनेक वेळा तक्रार करुन ही वेतन मिळत नसल्यने या कर्मचारी यांनी कंधार येथिल माजी सैनिकांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या.यावर माजी सैनिक बालाजी चुकलवाड, अर्जुन कांबळे ,शेख अजिज यांनी मुख्य अधिकारी विजय चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली आसता तिन टप्प्यात वेतन देण्याचे अश्वासन दिले आसल्यने या रोजनदारी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आंनद पसरला आहे.
प्रतिक्रिया
शहरातील पाणी पुरवढा सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे वेतन द्या.-बालाजी चुकलवाड
कंधार न.पा.तील रोजनदारी कर्मचारी यांना वेतन मिळत नसल्याने हे 28 कर्मचारी माझ्याकडे आले होते.या संदर्भात माजी सैनिक संघटनेने मुख्यधिकारी विजय चव्हाण यांची भेट घेवुन चर्चा केली असता तिन टप्प्यात बिल देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहीती बालाजी चुकुलवाड यांनी दिली आहे.
कोरोनामुळे वसुली नव्हती तिन टप्यात वेतन देणार-मुख्यधिकारी विजय चव्हाण
मुख्यधिकारी पदाचा चार्ज घेण्या पुर्वीचेच वेतन देणे बाकी होते.कोरोनामुळे वसुली नसल्यामुळे या रोजनदांरी कर्मचाऱ्यांचे वेतन बाकी आहे.सर्व सुरळीत होण्यास थोडा वेळ लागेल.होईल तेवढे लवकरात लवकर तिन टप्यात वेतन देण्यात येईल अशी प्रतिक्रिया मुख्यधिकारी विजय चव्हाण यांनी दिली आहे.