साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र स्थापनेच्या 12 वर्षे प्रलंबित असलेल्या मागणी संदर्भात अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाची स्वा.रा.ती.म.विद्यापीठ कुलगुरूंना भेट.

मुदखेड / प्रतिनिधी

दि.29-7-2021 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांना शिष्टमंडळाने भेटून 12 वर्षापासून प्रलंबित असलेल्या अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र स्थापनेच्या दिरंगाई बद्दल सविस्तर चर्चा केली.


चर्चेमध्ये कुलगुरू उद्धवराव भोसले साहेबांनी सांगितले की मी स्वतः या प्रश्नासाठी गांभीर्याने प्रयत्न करत आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून या संदर्भात 14 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य मंत्री मंडळास पाठवला असून त्याचा पाठपुरावा सातत्याने केला जात आहे.14 कोटी मागनीतील किमान50 लाख रुपये जरी मिळाले तर आम्ही अध्यासन केंद्र सुरू करण्यास तयार आहोत.मा.ना.उदयजी सामंत साहेब उच्च शिक्षण मंत्री यांनी ज्या चार अध्यासन केंद्राची घोषणा केली आहे त्या चारही अध्यासन केंद्रास मंत्रीमंडळाकडून अजून प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. त्याच बरोबर आर्थिक निधीही मंजूर करण्यात आले नाही. वरील सर्वबाबीची पूर्तता झाल्याशिवाय विद्यापीठात अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र सुरू करता येते नाही असे म्हणाले.


लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरू करण्यास मी व विद्यापीठ प्रशासन तयार आहोत, एक हॉल सुध्दा देता येईल पण प्रशाकीय मान्यता मिळाली नसल्यामुळे विद्यापीठ प्रशासन हतबल आहे. येणाऱ्या 10 ऑगस्ट पर्यंत मंत्री मोहदय किंवा राज्यपाल महोदयांच्या नांदेड दौरा आहे त्यावेळी मी स्वतः हा विषय मान्यवरांच्या लक्षात आणून देईन असेही म्हणाले.
अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सतिशजी कावडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळात मराठवाडा अध्यक्ष पिराजी एल गाडेकर चंपतराव हातागळे, परमेश्वर बंडेवार,शिवाजी निरूनंदे,गोपाळ वाघमारे, कैलास गायकवाड, प्रा. इरवंत सूर्यकार, शिव मुळे, डॉ. प्रदीप घाटेसह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *