कंधार ; प्रतिनिधी
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त रविवारी सकाळी 09 वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शाॅपिंग सेंटर नगर परिषद कंधार येथील शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृत्ती पुतळयास भारतीय बौद्ध महासभा शाखा कंधार च्या वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा कंधार चे तालुका अध्यक्ष विलास अण्णा कांबळे,कोषाध्यक्ष जितेंद्र ढवळे,रमाई गॅस एजन्सीचे मैंनेजर तुकाराम गायकवाड,मेजर संतोष दुंडे, सामाजिक कार्यकर्ते बाबुराव टोंप्पे,शंकर वाघमारे,संभाजी कांबळे आदीची उपस्थिती होती.