कंधार ; प्रतिनिधी
साठेनगर कंधार येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जयंती मंडळाच्या वतीने आशाताई यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थिताना बोलताना सौ.आशाताई शिंदे म्हणाल्या की,अण्णाभाऊ साठे यांचे विचार युवकांनी अंगीकारले पाहिजे ,अण्णाभाऊ साठे यांनी श्रीमंती व गरीबी याची दरी आपल्या साहित्यातुन मांडली तर शाहीरीतुन समाज प्रबोधन केले असे सांगून उपस्थितांना यावेळी साठे जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जयंती मंडळाच्या सर्व सदस्यांचा आशाताई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर चोंडे,जयंती मंडळाचे मारोती मामा गायकवाड,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेरू भाई,सरपंच सतीश देवक्तते,कोंडीबा पा. मोरे,माजी सरपंच बालाजी देवकांबळे,अवधूत पेठकर,महेश पिनाटे,प्रवीण मंगनाळे,विश्वाम्बर बसवंते,वसंत मगनाळे,नागेश गोधने सह कार्यकर्ते उपस्थित होते.