खा.प्रताप पाटील चिखलीकर यांचा वाढदिवसा निमित्त कंधार शहरात विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दिव्यांगाना ब्लेंकेट वाटप करुन साजरा


कंधार : नांदेड जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्रासह देशभरातून विविध मान्यवरांनी भ्रमणध्वनीवरून आणि प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. खासदार चिखलीकर यांच्यावर अक्षरशः अभिष्टचिंतनाचा वर्षाव झाला. यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.


जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर असणारे लोक नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस जि.प.सदस्य प्रविण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते आज कंधार मध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.


महीला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा चित्रलेखा गौरे यांनी दिव्यांगाना ब्लेंकेट वाटप केले तर अँड गंगाप्रसाद यन्नावार यांनी विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले त्या वेळेस लोहा पंचायत समितीचे सभापती आनंत पाटील, तालुका अध्यक्ष भगवान राठोड महिला मोर्चाचे जिल्हा अध्यक्षा चित्ररेखा गोरे कंधार उपनगराध्यक्ष जफर बोध्दिन, भाजप शहर अध्यक्ष अँड गंगाप्रसाद यन्नावार,शहर उपाध्यक्ष शंतनु कैलासे, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निलेश गोर,युवामोर्चा तालुका अध्यक्ष साईनाथ कोळगिरे, शिक्षक अघाडीचे राजहंस शहापुरे,माजी नगरसेवक सुनील कांबळे,चेतन केंद्रे,मधुकर डांगे,किशन डफडे,बालाजी तोतावाड, व्यंकट नागलवाड, रजत शहापुरे, अँड सागर डोंगरजकर,प्रविण बनसोडे,अविनाश गित्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *