कीटकनाशक वापरताना घ्यावयाची काळजी या विषयावर फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन ; तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांची माहीती

कंधार ; प्रतिनिधी

कीटकनाशक वापरताना घ्यावयाची काळजी या विषयावर फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी नांदेड डॉ.विपीन ईटणकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड रविशंकर चलवदे ,उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड रविकुमार सुखदेव यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मौजे संगुचिवाडी ता.कंधार येथे माधव शंकर घुमे यांच्या शेतात कंधारचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी रमेश देशमुख तालुका कृषी अधिकारी कंधार, सूर्यकांत ताडेवाड, नायब तहसीलदार,सुजलेगावकर मंडळ अधिकारी कंधार, शिवराम मुंडे,कृषी अधिकारी पंचायत समिती कंधार, रमाकांत भुरे,मंडळ कृषी अधिकारी,बारूळ, दत्तप्रसाद भारती विस्तार अधिकारी , भारती डी एन विस्तार अधिकारी, कुसेवाड, तलाठी, कृषी सहाय्यक शिवलिंग होनराव, गोविंद तोटेवाड भूषण पेटकर नामदेव कुंभारे वसंत मिटके कृषी पर्यवेक्षक श्रीराम वारकड , विनोद पुलकुंडवार सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, पत्रकार वैजनाथ गिरी,ज्ञानोबा गायकवाड कृषी निविष्ठा वितरक
शेतकरी दत्ता माधव घुमे ,बळीराम रूंजे, शंकर माधव घुमे, सुभाष सपुरे,गोविंद व्‍यंकटी झुकले,ज्ञानोबा वारकड, सुर्यकांत बोईनवाड ,विश्‍वनाथ शेवाळे,बळीराम लुंजे यांची उपस्थिती होती.


यावेळी मान्यवरांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत शेतावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे सर्व माहिती देण्यात आली तसेच विषबाधा झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजना यापूर्वीही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.पीक संरक्षण हा पीक उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या इतर अनेक घटकांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे पीक संरक्षणासाठी आपण कीटकनाशके रोगनाशके व तणनाशके यांचा वापर करतो बरेच वेळा एखाद्या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने शिफारस केलेल्या कीडनाशक याबाबत शेतकरी बांधवांना तसेच कीडनाशक विक्रेत्यांना माहिती नसते त्यामुळे चुकीची कीडनाशके वापरली जातात व त्यामुळे अपेक्षेप्रमाणे त्या किडीचे रोगाचे योग्य व्यवस्थापन होत नाही कीटकनाशकांचा योग्य व परिणामकारक वापर यासाठी अनेक बाबीकडे लक्ष द्यावे लागते पण सामान्यतः आपण त्याकडे दुर्लक्ष करतो अशा बाबी आपण कीटकनाशक वापरताना विचारात घेतल्या पाहिजेत योग्य कीटकनाशक शिफारस केलेली मानक संस्थेचे चिन्ह असलेली जी आपल्या नावाला जपतात अशा खात्रीच्या उत्पादकांची आणि आपल्या माहितीच्या विक्रेत्याकडूनच किटकनाशके घ्यावीत कीटकनाशके विकत घेताना त्यावरील नोंदणी क्रमांक बॅच क्रमांक उत्पादनाचा दिनांक वापरण्याची मुदत संपल्याची दिनांक इत्यादी माहिती असल्याची खात्री करूनच कीटकनाशके विक्रेत्याकडून पक्के बिल घ्यावे याची मुदत व कीटकनाशकांच्या प्रति बाबत काही शंका असल्यास ताबडतोब कृषी विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्याच्या भेटावे कीटकनाशके वापरतांना शेतकऱ्यांनी सर्वसाधारण कोणती काळजी घ्यावी गळके फवारणी यंत्र न वापरता ते दुरुस्त करून वापरावे कीटकनाशक फवारणी यंत्रात भरताना सांडू नये त्यासाठी नरसाळ्याचा वापर करावा तणनाशक फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा व तो पंप कीटकनाशक फवारणीसाठी वापरू नये कीटकनाशक वापरताना संरक्षक कपडे वापरावेत फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुऊन ठेवावेत खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावेत कीटकनाशकाला हुंगणे किंवा त्याचा वास घेणे टाळावे फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब दांड्याच्या किंवा काठीचा वापर करावा कीटकनाशक पोटात जाण्याची शक्यता असल्यामुळे फवारणी चे मिश्रण करताना अथवा फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे धूम्रपान करणे टाळावे फवारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुऊन खाणेपिणे करावे फवारणीच्या वेळी लहान मुले जनावरे पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणापासून दूर ठेवावे उपाशीपोटी फवारणी न करता फवारणीपूर्वी न्याहारी करावी .

फवारणी करताना वापरलेली भांडी साहित्य नदी ओढे किंवा विहिरी जवळ ठेऊ नयेत वापरलेले पाणी त्यात विषारी औषध असल्याने पडीक जमिनीत टाकावे अथवा मातीत गाडावे कीटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर नष्ट करून टाकाव्यात फवारणी करताना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून फुकू नये अथवा हवा तोंडाने आत सोडू नये त्यासाठी सोयीस्कर तार काडी किंवा टाचणी वापरावी कीटकनाशके फवारणीचे काम दर दिवशी आठ तासांपेक्षा जास्त वेळ करू नये हे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ठराविक कालावधीने डॉक्टर कडून स्वतःला तपासून घ्यावे कीटकनाशके फवारणीचे काम करताना वापरण्याचे कपडे स्वतंत्र ठेवावेत व वेळोवेळी स्वच्छ धुऊन काढावेत कीटकनाशके अंगावर पडू नये यासाठी वार्‍याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये कीटकनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना चरण्यासाठी कमीत कमी दोन आठवडे जाऊ देऊ नये जमिनीवर सांडलेले कीटकनाशक हाताने न पुसता त्यावर पाणी न टाकता ती माती चिखल यांच्या सहाय्याने शोषूण घ्यावेत व जमीनीत गाडून टाकावेत डब्यावरील मार्गदर्शक चिन्हांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे लाल रंगाचे चिन्ह असलेल्या औषधी सर्वात विषारी असून त्यानंतर पिवळा निळा हिरवा असा क्रम लागतो.
प्रथम उपचारासाठी घ्यावयाची काळजी झाल्यास तात्काळ डॉक्टरांना बोलवावे डॉक्टर येईपर्यंत पुढील प्रमाणे उपचार करावेत कीडनाशक पोटात गेले असल्यास पोटातील विष बाहेर काढण्यासाठी रोग्याला उलट्या करण्यास भाग पाडावे यासाठी 15 ग्रॅम मीठ ग्लासभर कोमट पाण्यातून पिण्यास द्यावे उलटीवर येणारे पाणी स्वच्छ होईपर्यंत ही कृती करत राहावे हाताची बोटे अथवा चमच्याच्या टोकाकडील भाग घशात घालूनही उलट्या करता येतात जर रोग्याला सारख्या उलट्या होत असतील तर वरील उपचार करू नयेत परंतु त्यास जास्त प्रमाणात कोमट पाणी पिण्यास द्यावे. श्वसनाद्वारे विषबाधा झालेल्या रुग्णाला तात्काळ उचलून मोकळ्या हवेत न्यावे खिडक्या व दारे उघडावी रुग्णाचे कपडे सैल करावेत श्वासोच्छ्वास नियमित होत नसल्यास त्यास कृत्रिम श्वास द्यावा त्याच्या छातीवर अतिरिक्त भार देऊ नये रुग्णास बडबड करू देऊ नये व तो जास्तीत जास्त शांत राहील याची काळजी घ्यावी. कोणत्याही स्वरुपात अल्कोहोल देऊ नये त्वचेवर कीडनाशक पडल्यास पाण्याने त्वचा धुवून काढावी कपडे काढताना त्वचेवर पाण्याची धार सोडावी त्वचा साबण किंवा पाण्याने पूर्णपणे धुवून काढावी फास्फोरस कीटकनाशकाची विषबाधा झालेली असल्यास साबनाचा चांगला उपयोग होतो कारण ती साबणामुळे लगेच विरघळून जाते विषबाधा कमी होण्यासाठी त्वचा त्वरित पाण्याने धुणे हे जास्त महत्वाचे आहे डोळ्यात कीटनाशक गेल्यास डोळ्याच्या पापण्या उघड्या ठेवाव्यात ताबडतोब पाण्याचा प्रवाह सोडून डोळे धुवावेत यात काही सेकंदाच्या उशीर झाल्यास जास्त प्रमाणात इजा होऊ शकते डॉक्टर येईपर्यंत सतत डोळे धुत राहावे जीवितहानी टाळण्यासाठी रुग्ण दगावू नये म्हणून रुग्णास हलक्या ब्लॅंकेटमध्ये गुंडाळावे गरम पाण्याच्या बाटल्यांचा उपयोग करू नये अंथरुणावर झोपवताना पोयाखाली उशा ठेवून पाय उंच ठेवावेत हातापायावर रबरी बड चढवावेत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कडक चहा अथवा कॉफी द्यावी कॅफीन किंवा एपिनेफ्रिन या उत्तेजकाचे इंजेक्शन त्वचेतून द्यावे डेक्स्ट्रोज ५% शिरेतून द्यावे गरज भासल्यास रक्त किंवा प्लाज्मा बदलावे अति उपचाराचा मारा करून रुग्णास दमवू नये लक्षणे व उपचार कीडनाशकाच्या सर्व प्रकारच्या विषबाधेवर लगेचच योग्य उतारा म्हणजे विषहार ॲन्टिडोट द्यावा.
सदरील कार्यक्रमांतर्गत कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण तसेच सोयाबीन पिकावरील कीड व रोगांच्या उपाययोजना बाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *