कंधार ; प्रतिनिधी
कोरोनाच्या प्रादूर्भावासमवेत डेंग्यूचे रुग्ण इतर काही जिल्ह्यामध्ये आढळून येत आहेत .तसेच कंधार येथील प्रायवेट प्रयोगशाळा येथून डेंग्यू रूग्ण आढळून आले आहेत पण ग्रामीण रुग्णालय कंधार येथे ताप येणारे डेंग्यू सदृश रूग्ण ग्रामीण रुग्णालयात येत आहेत.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एस.आर.लोणीकर यांनी रुग्णालयाची टीम केलेली आहे त्या टीममध्ये श्री.नरसिंग झोटींगे, श्रीमती. अनिता तेलंगे,ज्योती तेलंग श्री.प्रशांत कुमठेकर व त्यांची सर्व टीम जवळजवळ दहा दिवसपासून डेंग्यू रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी जाऊन प्रत्येक गल्ली नगर मध्ये आबेट पाण्यामध्ये टाकून त्यांना सूचना देत आहेत.
कोरडा दिवस पाळण्यासाठी मागर्दशन करण्यात आले .रमाईनगर , पत्रकार कॉलनी, भिमगड , महात्मा फुले हौसिंगसोसायटी ,एकनाथ नगर, संभाजी नगर, विजयगड, भवानी नगर,व्यंकटेशनगर, अभिनव नगर , सहयोग नगर येथे आहे. या भागामध्ये आबेटींग करण्यात आली .
फवारणी करण्यासाठी नगरपरिषद कंधार येथे
मा. मुख्याधिकारी यांना पत्र दिले आहे .
डेंग्यू हा आजार एडिस इजिप्टाय डासांमुळे उद्भवतो.या आजाराला आपण आपल्या परिसराची अस्वच्छता यातूनच निमंत्रण देतो.हा आजार केवळ डासांमुळे होत असल्यामुळे यावर प्रभावी उपाय म्हणजे परिसराची स्वच्छता हाच होय.एडिस इजिप्टाय डास होण्याच्या घरातील आसपासच्या जागा नागरीकांनी सतत स्वच्छ करणे आवश्यक आहे.आरोग्य साक्षरतेसाठी व सुरक्षित आरोग्यासाठी नागरिकांचा अधिक अधिक सहभाग वाढवा .
डेंग्यू तापाचे लक्षणे खालील प्रमाणे आहेत.
अंगदुखी, ताप, उलट्या, जुलाब,मळमळ,असे असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनामध्ये अधिक दडपण भीती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आरोग्याचे नाही ते संकट आपण स्वतः होऊन ओढुन घेण्यापेक्षा आपल्या घरातील व परिसरातील पाणी साचणाऱ्या जागा शोभेच्या कुंड्या, घरातील कुंड्या ,पाणी साठवूनूकीचे पात्र, हौद, स्वच्छ करून एक दिवस त्या कोरड्या ठेवल्या तर यावर १००%आळा बसू शकतो.
पावसाळ्यात जुलाब लागणे, उलटी होणे,हे जीवन दुषित आहे.
ताप येणे, डेंगू, मलेरिया आदी साथीचे रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी साथीचे रोग टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांनी केले आहे.
डासांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी नागरिकांनी घर व परिसरात पाण्याचे साठवण होणार नाही. पाण्याचे खड्डे तयार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. पाणी साठविण्यासाठी हौद, टॅक स्वच्छ धुवून घ्यावेत. निर्जंतुकीकरण करावे. घरातील बोर व इतर स्रोत पाण्याचे तपासणी नमुने भूजल तपासणी प्रयोगशाळा येथे पाठवावे. उघड्यावरचे अन्न, शिळे पदार्थ ,मास मटण,खाऊ नयेत. पाणी निर्जंतुकीकरण करूनच करण्यासाठी गरम पाणी उकळून घ्यावे. सोडियम हैपोसोल्युशन, टेमिफॉस ५०%,ब्लेचिंग पावडर, त्रुटीचा वापर करून पाणी निर्जंतुकीकरण करून घ्यावे. सार्वजनिक ठिकाणी हॉटेल, मंगल कार्यालय, धार्मिकस्थळे यांनी विशेष लक्ष ठेवावे. पाणी नमुने तपासणी करून घ्यावी. नागरिकांनी घरगुती परिसरातील कचरा वेळोवेळी नगरपालिकेच्या वाहनाद्वारे विल्हेवाट लावावी. जने करून घर व परिसर स्वछ राहिल. यामुळे साथीचे रोग होणार नाहीत.
डेंगु सारखे जीवघेणे आजार होणार नाहीत. याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांनी कंधार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व नगरसेविका शुद्ध पाणी पुरवठा करण्यासंदर्भात कळविले आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुर्यकांत लोणीकर यांनी कोविड-१९ अंतर्गत तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी नागरिकांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, मस्कचा वापर करावा, साबणाने हात स्वच्छ धुवावेत, ज्या नागरीकांनी लसीकरण केले नाही. त्यांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे असे आहवान केले आहे.