कंधार ; प्रतिनिधी
राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना समाजाच्या विकासाठी कटिबद्ध असल्यास च केलेल्या कार्याचे समाधान भेटते या साठी भरतीय जनता पार्टी सदैव अग्रेसर राहते असे प्रतिपादन भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी कंधार येथे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमा वेळी केले.
नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कंधार भाजपा च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम व विविध कर्यक्रमाचे आयोजन दि २ऑगस्ट रोजी कंधार येथे आयोजित करण्यात आले यावेळी प्रवीण पाटिल म्हणाले की चिखलीकर कुटुंबीय सदैव जनतेच्या सेवे साठी सदा अग्रेसर राहते प्रत्येक कर्यकरता हा चिखलीकर कुदुंबियांचा सदस्य म्हणून आमच्या सोबत राहतो,सेवा ही संघटन है । म्हणून भाजपा चा कार्यकरता काम करत असतो म्हणून आमच्या नेत्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा केला जातो असे ते या वेळी म्हणाले,खासदार प्रतापपाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसा निमित कंधार भाजपा च्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला या वेळी महिला मोर्च्याचे जिल्हा अध्यक्ष सौ.चित्ररेखा गोरे ताई यांच्या तर्फे दिव्यांग गरजूंना चादरी वाटप,कंधार भाजपा शहर अध्यक्ष गंगाप्रसाद यंन्नावार यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तर शिक्षक आघाडीचे तालुअध्यक्ष राजहंस शहापुरे यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना ब्लँकेट वाटप करण्यात आले सर्व सामाजिक उपक्रम भाजपा जिल्हा सरचिटणीस ,जिप सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या उपस्थित पार पाडला .
या वेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.चित्ररेखाताई गोरे,लोहा प.स.सभापती आनंद पाटील शिंदे,उपनगराध्यक्ष जफरोद्दीन बाहोद्दीन,भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड,भजपा शहरअध्यक्ष आड गंगाप्रसाद यन्नावार,तालुका सरचिटणीस किशनराव डफडे,माजी जि.प.सदस्य दत्तात्रय चंदनफुले,शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे,युवा मोर्च्या जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष साईनाथ कोळगिरे,,चेतन केंद्रे,मधुकर पाटील डांगे,अड सागर डोंगरजकर ,बालाजी तोटावाड,व्यंकट नागलवाड,प्रवीण बनसोडे,श्यामसुंदर शिंदे, सतीश कांबळे, उत्तम पाटील पवार,शेख असिफ,सय्यद अमजद,सय्यद जफर,संभाजी घुगे ,उमेश शिंदे, कांतराव आगलावे,व्यंकट गायकवाड सह आदी
भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह परिसरातील ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच उपस्थित होते..