नांदेड (प्रतिनिधी रूचिरा बेटकर)
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त राधा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व प्रियांका ब्युटी पार्लर अँन्ड मल्टीसर्ह्वासेस यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कोर्स याचा समारोप व नवीन बॅचचा शुभारंभ करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ.मोहनराव हंबर्डे (आमदार दक्षिण,नांदेड),मा.मोन्टीसिंघ जहागिरदार (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना,नांदेड),
सौ.उषाताई नरवाडे (जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना,नांदेड),मा.बाळासाहेब देशमुख(मा.नगरसेवक मनपा नांदेड), अब्दुल शफिक,बालाजी रणदिवे, पांडुरंग आडे,श्रीमती.उज्वला सुर्यवंशी, सौ.प्रेमला हणमंते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या 20 वर्षांपासून ही संस्था महिला,भगिनींना मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण देत आहेत. यातुन त्यांना सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. स्त्रियांचे सौंदर्य बाधित ठेवण्यासाठी कलेची देवाणघेवाणाची साखळी ही अशीच अखंडित राहो हिच या मागची भुमिका आहे. सौंदर्य शास्त्र हा विषय आता गल्ली बोळा पर्यंत पोहचला आहे. यातून महिलांच्या उदरनिर्वाह झाला पाहिजे.हा या मागचा उद्देश निरंतर चालू राहणार नाही.
या कार्यक्रमाचे आयोजन अॅड.सोनी सचिन खंडागळे,सौ.सरस्वती सिद्धार्थ कांबळे, डॉ.सना फातेमा शे.अर्शद, डॉ शेख अर्शद, श्री.सचिन खंडागळे यांनी केले. (कवियत्री, पत्रकार)सौ.रूचिरा बेटकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांभाळले.