खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसा निमित्त युवा नेते जि.प. सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते कंधार येथे ब्लँकेटचे वाटप

कंधार ; प्रतिनिधी

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसा निमित्त युवा नेते जि.प. सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते कंधार येथिल ग्रामीण रुग्णालयात ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालयात कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया कक्ष व प्रसुतीगृह कक्षातील रुग्णांना भाजपा शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे व रजत शहापुरे परिवार कंधार यांच्या तर्फे ब्लँकेट वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.चित्ररेखाताई गोरे,लोहा प.स.सभापती आनंद पाटील शिंदे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरविंद फिस्के,उपनगराध्यक्ष जफरोद्दीन बाहोद्दीन,माजी जि.प.सदस्य दत्तात्रय चंदनफुले,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष साईनाथ कोळगिरे,भजपा शहरअध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार,किशन डफडे सर,चेतनभाऊ केंद्रे,मधुकर पाटील डांगे,निलेश गौर,बालाजी तोटावाड,व्यंकट नागलवाड,लोह्याचे उत्तम पाटील पवार,संभाजी घुगे आदी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व रूग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *