नांदेड ; प्रतिनिधी
आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे, या संकल्पनेतून प्रतिसरकारची निर्मिती क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली. प्रतिसरकारद्वारे लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्थेची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनाधीन व्यक्तींचे पुनर्वसन अशी अनेक लोकोपयोगी कामे हाती घेत खऱ्या अर्थाने लोकराज्याची उभारणी केली.
जनसेवा आणि देशसेवा हे जीवीतकार्य मानणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त, दिनांक : ०३ ऑगस्ट २०२१ रोजी. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे, मा. श्री. पी. बी. खपले साहेब, अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी ( उच्च निवड श्रेणी ) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली..!
यावेळी,
मा. श्री. पी. बी. खपले साहेब, अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी ( उच्च निवड श्रेणी ) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड व कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती होती..!