भोकर ; प्रतिनिधी
भोकर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्याच्या दिशेने सुरु आहे.त्यामुळे रेल्वे क्षेत्रांतर्गत पुलाचे काम सुरु असल्यामुळे हा रस्ता दि.५ ते १० ऑगस्ट २०२१ च्या मध्यरात्री पर्यंत वाहतुकीसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे.
याबाबदची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी मा.जिल्हाधिकारी महोदय यांच्या नावाने जिल्हा माहिती. कार्यालयातून प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली.ही माहिती देतांना त्या प्रेसनोटमध्ये पर्यायी मार्ग सुचवितांना महामानव वंदनिय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या चौकाचा उल्लेख करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे न करता केवळ आंबेडकर चौक असा एकेरी उल्लेख केला आहे.
तसेच या पर्यायी मार्गावर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक नाहीच.परंतू अण्णाभाऊ साठे चौक असा उल्लेख केला आहे.ही माहिती चुकीची असून या मार्गावर आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे चौक आहे.आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे चौक असा उल्लेख करायला. पाहिजे होता.पण तसे करण्यात खले नाही.
याबाब माहिती घेतली असता असे समजले की,भोकर नगर परिषद व सा.बां.वि.भोकर ने ही माहिती प्रसिद्धी साठी उपरोक्तांना पुरविली आहे.जनहितार्थ वाहतुक प्रतिबंधात्मक पर्यायी मार्गाची माहिती देणे गरजेचे आहे. त्याबद्दल सर्वांचे मनस्वी धन्यवाद.परंतु,ही माहिती देतांना चुकीची व महामानवांचा नामोल्लेख एकेरी करणे योग्य नव्हे.आमच्या अस्मितेवर हा अप्रत्यक्षरित्या एक वारच आहे.अनावधानाने असे झाले असेल…..परंतु हेतुपुरस्कर झाले असेल तर ही बाब निषेधार्थ आहे.मी याचा निषेधच व्यक्त करतो व यापुढे असे होऊ नये अशी प्रशासनास विनंती करतो.
●●●
उत्तम बाबळे,संपादक
साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण