फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
फुलवळ गाव व गावकरी तसे सर्वच क्षेत्रात अग्रेसर , मग ते राजकारण असो का समाजकारण असो अथवा धार्मिक कार्यक्रम असो. सर्वचजण एकदिलाने मिळूनमिसळून प्रत्येक कार्य तडीस नेत असतात , मग आमली बारशी ची यात्रा असो का दरवर्षी होणारे अखंड हरिनाम व शिवनाम सप्ताह असो. यापूर्वीही फुलवळ येथे दरवर्षी असेच अनेक मोठमोठे कार्यक्रम पार पडले. सध्या येथीलच विठ्ठल रुख्मिनी मंदिरात रामायण या ग्रंथाचे पारायण चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून लक्ष्मण शक्ती चे आयोजन ही करण्यात आले आहे.
ता. ९ ऑगस्ट रोजी रात्री लक्ष्मण शक्ती च्या कार्यक्रमात वाचन व पोथीचा अर्थ सांगणे या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि ता.१० ऑगस्ट रोजी सकाळी सकाळी समारोप होईल . त्यानंतर उपस्थित गावातील व बाहेर गावाहून आलेल्या भाविकाबरोबरच वाचक , सूचक आणि समस्त गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन ही करण्यात आले आहे. या महाप्रसादानंतर सांगता होईल.