कंधार ; प्रतिनिधी
नांदेड जिल्हाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असताना.त्यांनी धानोरा कौठा हे गाव दत्तक घेतले होते. परंतु आता दत्तक घेतलेल्या गावाकडे दुर्लक्ष झाले असून भौतिक सुविधा रस्ताची दुरावस्था झाली आहे.
गावाच्या विकासासाठी कोणी वाली आहे का अशी गावकरी चर्चा करीत आहेत .राउतखेड फाटा ते धानोरा,मांजरम, बेंद्री मार्ग नायगाव रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची गरज असल्याने हे काम सुरु करावे अशी मागणी संयुक्त ग्रुप चे कंधार तालुका उपाध्यक्ष संदिप नवघरे धानोरकर यांनी केली आहे.
मौजे धानोरा कौठा
ता.कंधार येथिल पथदिव्यांचा पोल दलीत वस्ती साठी आलेला असताना सुध्दा मातंग समाजाची मागणी होती की हा पथदिव्यांचा पोल साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या मोकळ्या जागी लावण्यात यावी परंतु सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे स्मारकाच्या मोकळ्या जागे पासून अंदाजे 20 फुट अंतरावर लावुन समाजाच्या मागण्या धुळीस फेकल्या व सुडाचे राजकारण करत
असल्याची प्रतिक्रिया संयुक्त ग्रुप चे कंधार तालुका उपाध्यक्ष संदिप नवघरे धानोरकर यांनी दिली आहे.