कंधार ; प्रतिनिधी
१ मे २०२१ पासुन माजी आमदार व खासदार भाई डॉ.केशवरावजी धोंडगे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्याने माजी जि.प.सदस्य डॉ.प्रा.पुरुषोत्तम धोंडगे यांनी लॉकडाऊन काळात कंधार लोहा येथिल पेंशट व त्यांच्या नातेवाईकांना तसेच अम्बुलन्स चालकांना वेळेवर सकस आहार मिळावा म्हणून सुरु केलेल्या भाऊच्या डब्याने यशस्वीपणे १०० दिवास म्हणजे हंण्ड्रेड डेज पुर्ण केले आहेत.याचे सर्वत्र कौतुक होत असून आज दि.८ आँगस्ट रोजी स्वतः हजर राहुन कंधार रुग्णांना डब्याचे वाटप करुन हा उपक्रम असाच चालु राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली.
दि.८ चा मेनू पोळी,आलु मसाला, राईस असा होता.
“भाऊचा डबा” स्वतः भाऊ ग्रामीण रूग्णालय कंधार व ग्रामीण रूग्णालय लोहा तसेच इतर खाजगी रूग्णालय लोहा येथील पेंशट व त्यांच्या नातेवाईकांना तसेच अम्बुलन्स चालकांना दिला.
आदरणीय प्रा. डॉ. पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे अध्यक्ष, श्री शि. मो.ए. सो. कंधार तथा मा जी प सदस्य नांदेड.आदरणीय डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या शतकोत्सवाच्या व १ मे महाराष्ट्र दिन अन् कामगार दिनी आरंभ झालेला “भाऊचा डबा” बरोबर शंभरी दिवस पार केला.भर पावसात,उन्हात,अखंड सेवा देणाऱ्या उपक्रमातील सर्व सहभागी स्वयंसेवकांच्या मेहनतीला व ज्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू आहे असे प्रा. डॉ. पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे , यांच्या कार्याचे सर्वांनी अभिनंदन केले. हा “भाऊचा डबा” पौष्टिक आणि रुचकर या मुळे कंधार व लोहा तालुक्यात अल्पावधीत लोकप्रिय ठरला .