युवानेते प्रविण पाटील चिखलीकर यांनी कंधार लोहा तालुक्यातील गावांमधील महावितरण च्या अडचणी सोडवण्यासाठी घेतली बैठक

कंधार ; प्रतिनिधी

कंधार लोहा तालुक्यातील जनता महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला वैतागली आहे. सततची वीज गुल होणे, गावातील डीपी ना दुरुस्तीच्या तक्रारी माजी सभापती प्रविण पाटील चिखलीकर यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तातडीने सरपंचा कडून समस्या जाणून घेतल्या व महावितरण च्या अधिकारी यांची शेतकरी, सरपंचासह बैठक आयोजित करत महावितरण च्या अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले व शेतकरी बांधवांच्या अडचणी तात्काळ सोडवण्याच्या सुचना केल्या.

या बैठकीला विद्युत वितरण कंपनी चे अध्यक्षक अभियंता गोपूलवाड, कार्यकारी अभियंता चव्हाण, लोहा येथील उप अभियंता दवंडे, कंधार येथील उप अभियंता महेश वाघमारे, सिंदगीकर, कंत्राटदार कोपरे यांच्यासह कंधार-लोहा तालुक्यातील शेतकरी , सरपंच उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *