.आपल्या कडे काहीतरीे निमित्याने आपण दिवस , आठवडा, सप्ताह पाळत असतो साजरा करत असतो . सतत आपण काहीतरी गोष्टी किंवा बाब साजरं करत असतो. ते साजरा करताना भलताच उत्साह असतो आपल्यात. बहुतेक सर्वजण उत्साहात सहभागीही होतात . पण काही वेळातच आपण आज काय केलो ? कशासाठी केलो ? हे विसरून जातो . दुसऱ्या वर्षी नेमक्या त्याच दिवसाची कोणी तरी आठवण ठेवतो व पुन्हा आपण तो दिवस , आठवडा किंवा सप्ताह साजरा करतो . असे वर्षानुवर्षे चालू आहे चालत रहणार आहे
. आता हेच पहाणा ना आपण दरवर्षी झाडे लावा झाडे जगवा हा कार्यक्रम राबवतो . एक मुल एक झाड , एक विवाह एक झाड , प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर झाडं असे कितीतरी घोषणा देतो . कधीकधी घोषणेची अमलबजावणी होते . ती घोषणा जशी हवेत विरते तसेच लावलेले रोपटे जमीनीवर मान टाकते . या रोपट्याकडे पुन्हा कोणीही लक्ष देत नाहीत .
आपल्या धरणी मातेच वय साधरणतः ४५७ कोटी वर्षापूर्वीचं असावं असे जाणकार मानतात . सूर्यापासून पृथ्वी अंतराच्या मानाने तिसरे ग्रह आहे तर आकारमानाने क्रमांक पाचचे आहे . या आपल्या ग्रहाला ‘निळा’ ग्रह असे म्हणतात . पृथ्वी विश्वात ज्ञात गृहात एकमेक गृह की ज्या ठिकाणी सजीव सृष्टी आहे . पूरातन काळी पन्नास टक्के धरणी माता वनश्रीने नटलेली होती सजलेली होती . आजच्या सारखे धरणीमातेचे वस्त्रहरण कोणीही केलेले नव्हते . आजघडीला फक्त ९.४ % जंगल शिल्लक आहेत .
जंगलाचा फायदा काय आहे ? जंगल तोड केल्याचे परिणाम काय? यांचे विचार साधरण मानव प्राणी करताना दिसत नाही . जो तो स्वतः पुरता विचार करतो . जंगलाचं महत्व जोपर्यंत मानवाला कळत नाही कळणार नाही तोपर्यंत हे असेच चालू रहणार . पैसे झाडाला लागातात की? सहज आपण बोलून जातो . पण बघा सखोल विचार करून धरणी मातेच्या हिरव्यागार शालूवरच पैसे लगडलेले असतात . झाडे हीतर आपली फफ्फुसे आहेत . कोव्हीडने आक्सीजनची किंमत मानव जातीला पटवून दिलेली आहे . जंगलामुळेच जंगलातील सजीवाना आसरा मिळते. चारापाणी मिळते . जलचक्राचं नियमन ही जंगलावरच अवलंबून आहे . भूपृष्टाचे सरक्षण ही जंगलामुळेच होते . मानसाच्या गरजांचे नियमन ही जंगलच करत असते . जळाऊ लाकूड , इमारती लाकूड , औषधी वनस्पती हे सर्व आपण जंगलातूनच आणतो ना .
१९९० किंवा थोडं त्या पूर्वी पासून भयान जंगल तोड सुरु झाली ती आजपर्यंत तरी चालू आहे . या काळात जवळपास १७ .८ करोड हेक्टर जमीनवरील जंगल नाहीसे केलेले आहे . जागतिक पातळीवर विचार केला तर प्रत्येक व्यक्ती मागे o.५२ हेक्टर जंगल बाकी आहे . आपल्या देशाच्या नियामावलीनुसार किमान ३३% जंगल असणे बंधनकारक आहे . या नुसार आपल्या राज्याचा विचार केला तर अतिशय बिकट परिस्थिती आहे. महाराष्ट्रात सहा हजार नऊशे पस्तीस चौ किमी जमीन वनाखाली आहे . आपल्या देशाची तुलना केल्यास ते फक्त ८ % भरते .आपल्या राज्यात केवळ १९.४३% रान म्हणा , जंगल म्हणा ,फॉरेस्ट म्हणा की वन म्हणा शिल्लक आहे . या पैकी आठ हजार सातसे वीस चौ .कि मी घनदाट जंगल आहे . विस हजार सातसे सत्तर चौ .कि मी विरळ जंगल आहे . तर एकेविस हजार एकशे बेचाळीस चौ .कि मी राखीव जंगल आहे .
महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल विदर्भात आहे . त्यातल्या त्यात गडचिरोली जिल्हयात सर्वात दाट जंगल आहे . ठाणे ,नाशिक जिल्हयात ही भरपूर जंगल आहे . मराठवड्यात सर्वात कमी जंगल आहे .जंगलाच्या बाबतीत मराठवाडा भकास आहे .(तसे सर्वच बाबतीत आपण मागास आहोत याचे कारण आपली मानसिकवृती . मराठवाडी स्वतःला नेहमीच मागास समजतो . याचे कारण काय आहे हे आपण कधी शोधलो नाही . मागासलेपणा सोडलो नाही . याचं परिणाम ही आपल्याला जाणवत नाही . आपली मानसिकताच बोथट झालेली आहे . कारण आपला मराठवाडा गुलामाचं गुलाम होता . निजामावर इंग्रज भारी व आपल्यावर निजाम भारी . ही मानसिकता कदाचीत आपलातून गेली नसावी .)
आपल्या कडे झाडे लावण्याची चळवळ जोरात सुरु होते तेवढयाच जोरात बंद ही होते . आपल्या कडे दरवर्षी झाडे लावले जातात . पण ही झाडे नंतर कुठे जातात त्याचं काय झालं हे कोणीही पहात नाही . झाडे लावण्याचा दरवर्षीचा खड्डा एकच असते त्याची जागाही बदलली जात नाही . फक्त झाडे लावणारे बदलले जातात . फक्त फोटो काढण्या पूरते झाडे लावतात . हातवर करून घोषणा देतात . नंतर खड्डा तसाच रहातो पुढच्या वर्षी येणाऱ्या पाहूण्याची .
शासन किंवा सामजिक संस्था वनिकरणावर भर देतात करोडो रुपायाचा चुराडा केला जातो पण झाडे वाचत नाहीत . कारण समाज प्रवृती . त्या झाडाकडे पहाण्याचा दृष्टीकोण . झाडे कोणी लावली शासनाने . झाडे कोणाची शासनाची मग आपल्याला याचं काहीही देणंघेणं नाही . शासन पाहिल त्या झाडाचे काय करायचे ते . शासन झाडे लावा झाडे जगवा या योजनेवर करोडो रुपये खर्च करत आहे . पण मला एक प्रश्न पडतो . जेथे नैसर्गीक झाडे होती तेथील झाडे नष्ट करून बेशरमा सारखी झाडे का लावत आहेत . जंगलात पूर्वी साग , बेहडा , मोह , लेंडी , कटकटी , पळस, वड, पिंपळ ,पिंपरी, लिंब (निम) , धावंडा ,चारोळी बिबे ,अर्जुन , बाभूळ , बोरी , तेंदू , भाया या सारखी झाडे होती तसेच अनेक औषधी वनस्पती , वेली ही होत्या . ह्या उपयोगी सर्व वनस्पती , वेली व झाडे नष्ट करून त्या जागी कुठले बीनकामी झाडे लावत आहेत हेच कळी नाही . असं ते का करत असावेत .
मुखेड तालुका बालाघाटाच्या रांगेत वसलेला . वेगवेगळ्या झाडाझूडपांनी व वेलीनी डोंगरदऱ्या नटलेल्या होत्या . मुखेड तालुक्यात सर्वात जास्त झाडे होती पळसाची . होळीच्या महिण्यात सर्व जंगल आग्नीफुलांनी फुललेलं असायचे . चैत्र महिण्यापासून पळसांची झाडे नवे रूप धारण करायाचे . नवजीवन फुलायचे . पळसाची येवढी दाट झाडे होते की एकदा एखाद्याची नजर चुकली तर जनावरं नजरेस पडत नसत . शोधून शोधून परेशान होत .या झाडापासून छोट्या छोट्या हिरव्या पाण्याच्या डहाळी तोडून बंजारा लोक स्वतःचे घर तयार करायचे . जाळण्यासाठी लाकडे तोडायचे . पानापासून पत्रावळ्या व दुरण (द्रोण) तयार करायचे . तेंदूची पाने तोडून ते विकायचे . मोहाची फुलं जमा करून ते विकायचे किंवा दारु गाळायचे . धावंड्याचे डिंक जमा करायचे . बीबा व चारोळी तोडूनआणुन खायचे व विकायचे . ही झाडं म्हणजे गोरगरीबांना पोट भरण्यासाठी सहाय्य करणारी झाडं पण वनविभागने ही झाडे तोडून नविन झाडे जे की काहीही कामाचे नाहीत ते का लावत आहेत हेच कळत नाही .
आजही आपल्या मराठवाड्यात पळसांची भरपूर झाडे आहेत . त्यांना पाण्याची गरज नाही . प्राण्यापासून संरक्षणाची गरज नाही . ते नैसर्गिकरित्या वाढतात . हवेच्या साह्याने पळसाचे बी म्हणजे पळसपापडी हे आपोआप दुरदुर पसरतात व पाऊस पडलं की नविन पालवी त्या ठिकानी उगवते . आपोआप वाढते पण वनविभाग , सामाजिक संस्था , पर्यावरणासाठी झटणाऱ्या संस्था याकडे साफ दुर्लक्ष करत आहेत . ज्या भागात जी नैसर्गीक झाडे आहेत ती जोपासण्यासाठी वन संरक्षक विभागाणे जर लक्ष दिले तर जास्तीत जास्त पाचवर्षात सगळीकडे हिरवेगार माळरान दिसेल . जंगलानां पूर्वीचे रूप मिळेल . वनवासी लोकांना रोजगार मिळेल .
जागोजागी रोपवाटीका तयार करून त्यावर करोडो रुपये खर्च केले जातात . रोपवाटीकावर खर्च करण्यापेक्षा जर शेतकऱ्यांना सांगून त्यांना बांधावर झाडे लावण्यास प्राधान्य दिले तिकडे रोपवाटीकेवर होणारा खर्च जर शेतकऱ्यांना दिला तर नकीच शेतकरी राजा आनंदाने बांधवर झाडे लाविल ते काळजीपूर्वक वाढवतील त्या झाडांना ते स्वतः च्या अपत्या प्रमाणे जपतील.
चिपको आंदलोन सारखी एखादी चळवळ राबून लोकांना झाडाचे महत्व पटवून देता येईल . हे काम सातत्याने करावे लागेल . गरिब भूमीहीन शेतकऱ्यांना काही अटीवर एकर दोन एकर जमीनीचा तुकडा देऊन त्यांना जर पन्नास साठ एकरवर निसर्गरित्या येणारी झाडे लावण्यास व जोपसण्यास सांगितले तर ते अतिशय तन मनाने झाडे लावतील व वाढवतील त्याचे संवर्धन करतील . असे केल्याने शासनाचे करोडो रुपये वाचतील व जंगल ही जीवंत राहील .
आपल्याकडे लावत असलेले झाडं कोणती ? त्याचा उपयोग काय? त्याचे नाव काय? हे स्थानिक लोकांना माहित नाही . झाडं कोण लावते शासनाचे वनविभाग . मग तेथे आपला संबध येत नाही . झाडं राहिली का किंवा वाळली काय व कोणी उपडून टाकले काय यांच स्थानिक लोकांना काहीही देणंघेणं नाही . याचं कारण वनविभाग स्थानिक लोकांना कधीच विश्वासात घेत नाहीत . वनविभागाच्या गणतीत स्थानिक लोक नसतातचं . विशेष म्हणजे ते झाड त्यांच्या कोणत्याच उपयोगाला येत नाही . उन्हात ही झांड तगही धरत नाही . उन्हाळ्यात बहूसंख्य झाडे वाळून जातात . खड्डे तेवढे शिल्लक रहातात . पावसाळ्यात हिरवेगार दिसणारे जंगल उन्हाळ्यात सताड उघडे पडलेले असते चिमणीला बसायलाही सावली नसते . अशी झाडे वनविभाग लावत आहेत .
माळरानावर बीया फेकायचीही गरज पडत नाही . ते आपोआप नैसर्गीकरित्या वेगवेगळ्या मार्गाने जमनीवर पडतात .पावसाळ्याच्या पहिल्या पाण्यावर उगवतात व नंतर जोमाने वाढतात . म्हणून वन विभागाने , शासन प्रशासनाने माळरानावर नकली तकलादू झाडे रोपवाटीकेत लावून ते वर्षानुवर्षे एकाच खड्यात लावण्याचा कार्यक्रम न करता स्थानिकाच्या मदतीने त्यात्या भागातील झाडाची लागवड व संवर्धन केल्यास जंगल फुलायला वेळ लागणार नाही हे निश्चित .
. . .. . . . .
राठोड मोतीराम रुपसिंग
विष्णुपूरी, नांदेड -६
९९२२६५२४०७