कंधार ; प्रतिनिधी
कोरोना व्हॅकसीनचा व आरोग्य संवर्धनाचा संदेश देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी आज रविवार दि.८ अॉगस्ट रोजी पत्नी सौ.इटणकर सह ५० सायकलींग टीमने कंधार येथिल भुईकोट किल्लास भेट दिली. तसेच पांगरा , संगुची वाडी, कोटबाजार गावासह कंधार शहरातील नागरिका सोबत आरोग्य विषयक चर्चा केली.
जिल्हाधिकारी डॉ.विपीनजी इटनकर ,कंधारचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे तसेच नांदेड येथून ५० सायकलीस्ट किल्यास सदिच्छा भेट देण्यासाठी आले असताना कंधार येथिल FIT-N -FINE HEALTH CLUB चे सुनिल सादलापुरे,डॉ.भगवान जाधव,डॉ.रामभाऊ तायडे,भास्कर नळगे ,चालीकवार ,विकी बिडवई,प्यांरा.शंकर गित्ते,ॲड.अनिल डांगे,ॲड.कोळनुरकर, डॉ.पांचाळ,डॉ.फाजगे आदीसह टिमने,जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व मान्यवरांचे स्वागत करुन अल्पोपहाराचे जोरदार नियोजन केले .
दरम्यान कोटबाजार ग्राम पंचायत च्या वतीने कंधारचे माजी उपनगरअध्यक्ष बबर मोहम्मद यांनी स्वागत केले.